अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे आज प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST2021-07-11T04:21:51+5:302021-07-11T04:21:51+5:30

असगोली : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ या मासिकाचे रविवार, ११ जुलै राेजी सकाळी ११ वाजता ...

Today's publication of Andhashraddha Nirmulan Patrika | अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे आज प्रकाशन

अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे आज प्रकाशन

असगोली : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ या मासिकाचे रविवार, ११ जुलै राेजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन प्रकाशन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस नितीन राऊत व मासिकाचे संपादक प्रा. डॉ. नितीन शिंदे यांनी दिली.

मासिकाचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर (नागपूर) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, सुशीला मुंडे, राज्य सरचिटणीस सुरेखा भापकर, डाॅ. ठकसेन गोराणे व कार्यकारी समिती करत आहे. सोशल मीडिया जबाबदारी नितीन राऊत व नंदकिशोर तळाशीलकर हे सांभाळणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Today's publication of Andhashraddha Nirmulan Patrika