२८ वर्षांपासून आजार, कंटाळून वृद्धाने संपविले जीवन; रत्नागिरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 18:44 IST2025-10-20T18:41:57+5:302025-10-20T18:44:32+5:30
आजारावर रत्नागिरी आणि मुंबईतील डॉक्टरांकडे उपचार सुरू होते

२८ वर्षांपासून आजार, कंटाळून वृद्धाने संपविले जीवन; रत्नागिरीतील घटना
रत्नागिरी : आजारपणाला कंटाळून तालुक्यातील तरवळ माचिवलेवाडी येथील वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी दामा माचिवले (वय ७०) असे त्यांचे नाव असून, ही घटना शुक्रवारी (दि.१७) घडली.
शिवाजी माचिवले यांना सुमारे २८ वर्षांपासून मेंदूला रक्त पुरवठा कमी होत असल्याचा आजार होता. त्या आजारावर रत्नागिरी आणि मुंबईतील डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. या आजारपणाला कंटाळून त्यांनी घरात कोणीही नसताना लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
याबाबत त्यांच्या नातेवाइकांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.