शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन वेतन प्रणालीचे तीनतेरा

By admin | Updated: October 9, 2014 23:02 IST

अनुदान नाही : पगार लांबणीवर

टेंभ्ये : सध्या राज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आॅनलाईन वेतन प्रणाली वापरली जात आहे. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला कर्मचाऱ्यांना पगार मिळावा, हा या योजनेचा हेतू आहे. रत्नागिरीत मात्र सुरुवातीपासूनच माध्यमिक शिक्षकांच्या पगाराबाबत या योजनेचे तीनतेरा वाजले असल्याचे पाहायला मिळत आहे.जिल्ह्यात माध्यमिक शिक्षकांचे पगार नेहमीच उशिरा होत असल्याचे दिसून येत आहे. बऱ्याच वेळा शासनाकडून अनुदान प्राप्त होत नसल्याने पगार उशिरा होतात. सण वा उत्सवांना कर्मचाऱ्यांना वेळीच पगार मिळावा, यासाठी शासन आग्रही असतानाही रत्नागिरी जिल्ह्यात मात्र माध्यमिक शिक्षकांना असे पगार मिळाल्याची उदाहरणे दुर्मीळ आहेत.आॅनलाईन वेतन प्रणालीमुळे सर्व कर्मचाऱ्यांना वेळीच पगार मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात अन्य कर्मचाऱ्यांना या प्रणालीचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत मात्र ही प्रणाली पूर्णत: कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. बऱ्याच वेळा शासनाकडून पगार अनुदान वेळीच मिळत नसल्याने शिक्षण विभागासमोर समस्या निर्माण होते. यामुळे पगार लांबणीवर पडतात, असे शिक्षण विभागाचे मत आहे. माध्यमिक शिक्षक हा घटक दुर्लक्षित राहात असल्याचे यातून स्पष्ट होते. सध्या सप्टेंबर महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. वास्तविक हा पगार दसऱ्याला मिळणे अपेक्षित होते.एकंदरीत माध्यमिक शिक्षकांचा पगार वेळीच मिळावा, या हेतूने प्रयत्न होणे आवश्यक आहे. सातत्याने हा घटक दुर्लक्षित राहात असल्याने प्रशासनाने याबाबत दखल घेणे गरजेचे आहे. (वार्ताहर)माध्यमिक शिक्षक उपेक्षितजिल्हा बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून शिक्षकांना त्रासदायक वर्तणूक मिळत असल्याची तक्रार अनेक शिक्षकांकडून ऐकायला मिळत आहे. अगदी पासबूक भरण्यापासून ते कॅश घेण्यापर्यंत सर्वच टप्प्यावर शिक्षकांना ताटकळत उभे राहावे लागते. बऱ्याच वेळा कर्मचाऱ्यांकडून शिक्षकांना अपमानजनक वागणूक दिली जात असल्याचे बोलले जात आहे. शिक्षकांच्या पगार खात्याची बँकेला गरज आहे की नाही?