शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

शाळेत गेले डॉक्टर, रत्नागिरी जिल्ह्यात पावणेतीन लाख विद्यार्थ्यांची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:42 IST

‘आरबीएसके’ अंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांची मोफत तपासणी

रत्नागिरी : जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत अंगणवाडी आणि शाळांमधील १८ वर्षांपर्यंतच्या मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. या कार्यक्रमांतर्गत या आर्थिक वर्षात तब्बल २ लाख ७३ हजार २६७ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यातील २६,१७१ बालकांना शालेय स्तरावर उपचार उपलब्ध करून देण्यात आले तर ७,५७२ मुलांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये १ एप्रिल २०१३ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. लहान मुलांमधील जन्मजात विकृती, कमतरतेमुळे होणारे आजार, वाढीच्या वेळी होणारे आजार यांचे वेळीच निदान करुन उपचार करणे हे या कार्यक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात ० ते १८ वयोगटातील मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते. यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका आणि औषध निर्माता यांचा समावेश असलेली पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडीतील बालकांची व शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते.अंगणवाडीतील बालकांची या पथकामार्फत आर्थिक वर्षात दोन सत्रात (एप्रिल ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते मार्च) तपासणी होते आणि शालेय विद्यार्थ्यांची एकदा तपासणी केली जाते. किरकोळ उपचारांची गरज असल्यास तातडीने तिथेच उपलब्ध करून दिले जातात. आवश्यक असेल त्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालय येथे (संदर्भीय सेवा) पाठविले जाते.या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील २,९०१ अंगणवाड्या आणि ३,०१९ शाळांमधील ३,२२,५४७ बालकांपैकी आतापर्यंत २,७६,२६७ बालकांची तपासणी करण्यात आली. गरज असलेल्या २६,१७१ बालकांना किरकोळ उपचार देण्यात आले. तर ७,५७२ विद्यार्थ्यांना संदर्भीय सेवा मिळाली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHealthआरोग्यStudentविद्यार्थीSchoolशाळा