शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मिऱ्याला सागरी आक्रमणाचा धोका

By admin | Updated: June 11, 2014 00:43 IST

बंधारा नादुरुस्त : पौर्णिमेला सागरी उधाणाचे पाणी

रत्नागिरी : तालुक्यातील जाकीमिऱ्या या सागरी किनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक बंधारा अनेक ठिकाणी कोसळलेला आहे. काही ठिकाणी दुरूस्तीच न झाल्याने पावसाळ्यात या गावातील किनाऱ्यावरील घरांना धोका निर्माण झाला आहे. येत्या पौर्णिमेला (१२ जून) येणाऱ्या सागरी उधाणाचे पाणी गावात घुसण्याची शक्यता असल्याने किनाऱ्यावर घरे असलेल्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सागरातील पाणी खवळले असून, तुफानी लाटांचे तडाखे जाकीमिऱ्या भागाला बसत आहेत. विश्वदत्त पाटील यांच्या घराजवळील दगडी धूपबंधारा जागोजागी कोसळला आहे. त्यामुळे सध्या याठिकाणी असलेल्या घरांच्या आवारात सागरी लाटांचे पाणी घुसत असल्याचे पाटील यांनी या धूपबंधाऱ्याच्या पाहणीवेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, जाकीमिऱ्या भागात किनारपट्टीवर सुमारे साडेचारशे घरे आहेत. त्यातील सुमारे ५० घरे ही किनाऱ्याच्या खूप जवळ असून, त्यांना पावसाळ्यात सागरी आक्रमणाचा अधिक धोका आहे. नऊ वर्षांपूर्वी येथे धूपबंधारा उभारण्यात आला. मात्र, तो योग्यप्रकारे न उभारल्याने व अत्यंत लहान दगड वापरले गेल्याने जागोजागी कोसळला आहे. सागरी लाटांचा मारा सहन करण्याची ताकद या लहान दगडांमध्ये नाही. त्यामुळे लाटांच्या धडकेने हे दगड पाण्यात वाहून गेले आहेत.परिणामी जागोजागी बंधाऱ्याला भगदाडे पडली आहेत, असे पाटील यांनी सांगितले. गेल्या आॅक्टोबर महिन्यात पालकमंत्री उदय सामंत यांना या बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी बोलावले होते. त्यांनी पाहणी केल्यानंतर या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करू, असे त्यावेळी सांगितले होते. मात्र, त्यानंतरही येथे दुरुस्तीबाबत काहीच घडले नाही. त्यामुळे किनारपट्टीवरील घरात पावसाळ्याच्या उधाणामध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाल्याचे पाटील यांनी सांगितले. जाकीमिऱ्यातील सागरी किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची डागडुजी काही ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी बंधारा कोसळला आहे. बागकरवाडी व मुरुगकरवाडी येथे मोठ्या प्रमाणात बंधारा कोसळला असल्याने पावसाळ्यात सागरी उधाणाचे पाणी गावात शिरण्याची भीती जाकीमिऱ्याचे सरपंच नार्वेकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)