सणासुदीत संगमेश्वरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन मंदिर, एक घर फोडले

By अरुण आडिवरेकर | Updated: October 26, 2022 11:35 IST2022-10-26T11:34:31+5:302022-10-26T11:35:03+5:30

वाघजाई मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटी फोडली,

Thieves broke into three temples and one house in one night in Sangameshwar | सणासुदीत संगमेश्वरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन मंदिर, एक घर फोडले

संग्रहित फोटो

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यात एकाच रात्री तीन मंदिर व एक घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. एकाच रात्री चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने सगंमेश्वर पोलिसांची झोप उडवली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील ३ मंदिरातील दानपेट्या फोडून नावडी परिसरातील एका घरातून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. तर श्री वरदायनी देवीच्या गाभाऱ्यातील स्टीलची दानपेटी फोडून चोरट्यांनी दानपेटीतील रक्कम चोरून नेली. त्यानंतर चोरट्यानी सरंद गुरव वाडीतील वाघजाई मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटी फोडली, त्यानंतर माखजन धामापूर गुरववाडीतील श्री नवसरी ग्रामदेवीच्या मंदिरातील गाभाऱ्यातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली.

संगमेश्वर तालुक्यातील ३ मंदिरातील दान पेट्यांवर डल्ला मारून चोरट्यांची पावले नावडी परिसराकडे वळली. नावडी येथील वैशाली संजय रहाटे यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील ७ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस स्थानकात चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

Web Title: Thieves broke into three temples and one house in one night in Sangameshwar