रत्नागिरीत भर दिवसा चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडले, वर्दळीच्या परिसरात चोरी झाल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:51 IST2025-07-31T15:50:32+5:302025-07-31T15:51:08+5:30
शहरातील जयस्तंभ मार्ग हा वर्दळीचा परिसर

रत्नागिरीत भर दिवसा चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडले, वर्दळीच्या परिसरात चोरी झाल्याने खळबळ
रत्नागिरी : शहराच्या मध्यवर्ती भागातील जयस्तंभ ते स्टेट बँक मार्गावर असणाऱ्या एका संकुलातील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीला आली.
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ मार्ग हा वर्दळीचा परिसर आहे. याच रहदारीच्या परिसरात चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या चोरीची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे अद्याप किती रुपयांचा ऐवज चाेरीला गेला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.
मात्र, भरदिवसा चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर आणि शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन चाेरट्यांच्या शाेधासाठी तपासाची चक्र वेगाने फिरवण्याचे आदेश अंमलदारांना दिले आहेत.