शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

..तर कॅबिनेट मंत्रिपद मिळालं असते; दापोलीतील कार्यक्रमात योगेश कदम यांनी सांगून टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:04 IST

५० वर्षांची उणीव काही लगेचच पाच वर्षांत भरून काढता येत नाही

रत्नागिरी : मी हट्ट धरला असता तर मला कॅबिनेट मंत्रिपदही मिळाले असते; पण कॅबिनेट मिळाले असते तर कदाचित एकच खातं मिळालं असतं आणि मला खात्री नव्हती की, काेणतं खातं मिळेल. त्यामुळे मी स्वत:हून राज्यमंत्रिपद मागून घेतलं. कारण, त्या पदाच्या माध्यमातून काेकणात काही चांगल्या गाेष्टी करू शकताे, अशा भावना राज्यमंत्री याेगेश कदम यांनी दापाेलीतील एका कार्यक्रमात बाेलताना व्यक्त केल्या.दापाेलीतील एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन साेहळ्यासाठी मंत्री याेगेश कदम उपस्थित हाेते. शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमात मंत्री याेगेश कदम यांनी प्रथमच आपल्या मनातील भावना सर्वांसमाेर व्यक्त केल्या. ते म्हणाले की, आज ५० वर्षांनंतर दापाेली तालुक्याला मंत्रिपद मिळाले आहे. हा खूप माेठा कालावधी आहे. त्यामुळे ५० वर्षांची उणीव काही लगेचच पाच वर्षांत भरून काढता येत नाही. त्याकरिता अनेक याेजना राबवल्या गेल्या पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न करताेय, असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की, कदाचित मी हट्ट धरला असता तर मला कॅबिनेटपदही मिळालं असतं; पण मी राज्यमंत्रिपद मागू घेतलं. कारण, मला खात्री हाेती की, कॅबिनेटपद मिळालं तर एकच खातं येईल आणि कुठलं खातं येईल, याची खात्री नव्हती; पण जर राज्यमंत्रिपद मिळालं तर चांगली खाती मिळू शकतात, हे माहिती हाेतं.

आधी मतदारसंघमंत्री म्हणून माझ्या डाेळ्यांसमाेर आधी दापाेली मतदारसंघ, मग माझं काेकण आणि नंतर महाराष्ट्र, असे सूत्र ठेवून मी काम करत आहे. माझ्याच सहकाऱ्यांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे. याेग्य व्यक्तीही याेग्य स्तरावर असली पाहिजे, अशी माझी धारणा असल्याचे ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Minister Yogesh Kadam reveals state minister preference in Dapoli event.

Web Summary : Yogesh Kadam stated he chose Minister of State post for broader Kokan development. A cabinet position might have limited him to one unspecified department. He prioritizes Dapoli constituency, Kokan, and Maharashtra.