Ratnagiri: समुद्रात पडलेली ‘ती’ बेपत्ता तरुणी नाशिकमधील?, शोध सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:10 IST2025-07-02T13:09:49+5:302025-07-02T13:10:32+5:30
दोन दिवसांनंतरही लागलेला नाही शोध

Ratnagiri: समुद्रात पडलेली ‘ती’ बेपत्ता तरुणी नाशिकमधील?, शोध सुरुच
रत्नागिरी : येथील भगवती मंदिरानजीक डोंगरावरून समुद्रात पडलेल्या तरुणीचा दोन दिवसांनंतरही शोध लागलेला नाही. दरम्यान, नाशिकमध्ये एक तरुणी बेपत्ता झाली असल्याची माहिती रत्नागिरीपोलिसांना मिळाली असून, तिचे पालक लवकरच रत्नागिरीत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर, या प्रकरणाचा काहीतरी उलगडा होण्याची शक्यता आहे.
भगवती मंदिरानजीक एक तरुणी रविवारी दुपारी सुमारे २०० ते २५० फूट खाली समुद्रात पडली. तिचा शोध अजूनही लागलेला नाही. दरम्यान, नाशिकच्या पिंपळगाव पोलिस स्थानकात एक तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. हरयाणाची ही तरुणी तेथे बँकेत काम करत होती. रत्नागिरीत बेपत्ता झालेली तरुणी तीच आहे, याची खातरजमा आता केली जाणार आहे.