शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच आणणार, मंत्री नारायण राणे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 12:42 IST

व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे घेणार

चिपळूण : रिफायनरी होऊ देणार नाही म्हणणाऱ्यांची ताकद किती आहे, ती रोजच्या रोज आवळत चालली आहे. त्यामुळे त्यांनी सारखी चिव-चिव करू नये. हा प्रकल्प राबवल्याने जिल्ह्यातील लोकांचेच हित होणार आहे. येथील जनतेला मोठा रोजगार मिळणार आहे, लोकांचे दरडोई उत्पन्न वाढल्यास जिल्ह्याच्या विकासाला तसेच देशाच्या अर्थकारणालाही चालना मिळणार आहे. बेकारी दूर करण्याच्या प्रक्रियेत विरोधकांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.खेड तालुक्यातील लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माउली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान गो-शाळेतर्फे ज्येष्ठ गोभक्त, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप पुणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दि. २६ ते २८ जानेवारीदरम्यान राष्ट्रीय गो-संमेलन आयोजित केले आहे. संमेलनाच्या समारोपासाठी मंत्री नारायण राणे उपस्थित हाेते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.मंत्री राणे यांनी सांगितले की, कोकणात अनेक शिकलेल्या तरुणांना नोकऱ्या हव्या आहेत. रिफायनरीच्या माध्यमातून तो पर्याय उपलब्ध होणार आहे. रिफायनरीसाठी पूरक असलेले अनेक मोठे उद्योगही येथे सुरू होणार आहेत. त्यामध्येही जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा कायापालट होईल.व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे घेणारजिल्ह्यातील तरुणांनी विविध व्यवसाय सुरू करावेत. यासाठी येत्या काही दिवसांत लघू, मध्यम व अवजड उद्योग मंत्रालयातर्फे प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार आहे. या शिबिरात तरुणांना व्यवसायसंबंधी प्रशिक्षण दिले जाईल. त्यातून विविध उद्योग सुरू होण्यास चालना मिळेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

आरक्षणावर आज बोलणारमराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र, कोकणातील मराठा समाजात आरक्षणाच्या मागणीवरून दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. याविषयी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना विचारले असता उद्या, सोमवारी मुंबईत अधिकृतपणे भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पNarayan Raneनारायण राणे