शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

अध्यापक संघाचे उद्या राज्यस्तरीय आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2015 22:32 IST

शिक्षणमंत्र्यांचा निषेध : शिक्षकवर्गात संताप

टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने शनिवार, दि. ३ आॅक्टोबर रोजी राज्यस्तरीय आंदोलन करण्यात येणार आहे. राज्याचे शिक्षणमंत्री शिक्षकांना कामचुकार असे संबांधले, तर मुख्याध्यापकांना जेलमध्ये टाकण्याचे वक्तव्य केले, या त्यांच्या वक्तव्याचा निषेध आंदोलनप्रसंगी केला जाणार आहे. शिक्षकांच्या विविध समस्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनाच्या माध्यमातून अध्यापक संघ काही महत्त्वपूर्ण मागण्या समोर ठेवणार आहे. शाळांची संरचना व संचमान्यतेबाबतचा २८ आॅगस्टचा शासन निर्णय त्वरित रद्द करावा, या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील शिक्षणक्षेत्रामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पायाभूत चाचणी क्रमाक्रमाने पहिली ते आठवीच्या वर्गासाठी घेण्यात यावी, अन्यायकारक अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, शिक्षकेतर कर्मचारी आकृतीबंधाबाबत शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालानुसार कार्यवाही करावी, भरतीवरील बंदी उठवून सर्व संवर्गातील पदे त्वरित भरावीत, २०१३ - १४च्या संचमान्यतेनुसार कमी करण्यात आलेल्या शिक्षणसेवकांना सेवेत रुजू करण्यात यावे, अशा मागण्या आहेत. (वार्ताहर)महाराष्ट्र शासनाची नवीन धोरणे म्हणजे माध्यमिक शाळा बंद करण्याचे षड्यंत्र आहे. राज्यातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळणे आवश्यक आहे. परंतु, शासन माध्यमिक शाळा बंद करुन इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांना प्रोत्साहन देत आहे. २८ आॅगस्टसारख्या सुलतानी शासन निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील माध्यमिक शिक्षक पेटून उठतील. - ज्ञानेश्वर कानडे राज्याध्यक्ष, अध्यापक संघमाध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने ३ आॅक्टोबर रोजी शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षणमंत्र्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात येणार आहे. - भारत घुले, अध्यक्ष, जिल्हा अध्यापक संघ