शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा येणार महागाई घेऊन

By admin | Updated: June 23, 2014 01:33 IST

चाहुल गणेशोत्सवाची : यंदाही मूर्तींचे दर वाढण्याची चिन्हे

रत्नागिरी : सर्व भक्तांना वर्षभर प्रतीक्षा करावा लागणारा गणेशोत्सव अवघ्या दीड दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे. मूर्तिशाळेमध्ये मात्र कामाची लगबग सुरू झाली आहे. देशात बोकाळलेल्या महागाईची झळ बाप्पांना बसू शकते. वाढते इंधनदर, मजुरी, रंग, मातीचे दर वधारल्याने मूर्तीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. वर्षभर भक्तगण गणपती बाप्पांच्या आगमनाची वाट पाहात असतात. घरोघरी गणेशमूर्ती आणून भक्तिभावाने त्या पूजल्या जातात. यावर्षी गणेशोत्सव २९ आॅगस्ट पासून सुरू होत आहे. त्यामुळे गणेशमूर्ती तयार करणाऱ्या चित्रशाळेत कामाची लगबग सुरू झाली आहे. बहुतांश मूर्तिकार अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर माती भिजवून कामाचा शुभारंभ करतात. प्रामुख्याने शाडूच्या मूर्ती तयार केल्या जात असल्याने शाडूची माती गुजरातमधून मागवावी लागते. इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. परिणामी गतवर्षी २०० ते २२५ रूपयांना मिळणारे शाडूच्या मातीचे पोते यावर्षी २५० ते २७५ रूपये दराने विकण्यात येत आहे. भिजवलेल्या मातीचा गोळा साच्यात ठेवून त्याला सुंदर गणेश मूर्तीचा आकार दिला जातो. मात्र, मूर्तीवरील कोरीव काम, सुबक रंगकाम करण्यासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता आहे. मात्र, ग्रामीण भागात सध्या संबंधित कारागिरांची उणीव भासू लागली आहे. पावसाळा सुरू असल्याने वातावरणात आर्द्रता असते. परिणामी मूर्ती वाळण्यास वेळ लागतो. शेतीची कामे सुरू असल्याने मजूर नियमित येत नाहीत. महागाईमुळे मजुरीचे दरही वाढले आहेत. याशिवाय रंगाच्या दरातही वाढ झालेली दिसून येत आहे. यामुळे बाप्पांच्या मूर्तीचे दर यावर्षी वाढणार हे नक्की आहे. सव्वा इंचापासून चार फुटी गणेशमूर्ती भक्त तयार करून घेतात. सार्वजनिक गणेश मूर्ती चार फुटापासून दहा बारा फुटी असते. मुंबई, पुणे यांसारख्या शहरात मोठमोठ्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मंडळांमध्ये चुरस लागते. बहुधा मोठ्या मूर्ती जागेवरच तयार केल्या जातात, जेणेकरून हलविताना त्याचा त्रास होत नाही. तसेच मोठ्या मूर्ती मातीऐवजी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या तयार करण्यात येतात. पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसचा वापर करण्यास मज्जाव करण्यात येत असला तरी मोठ्या मूर्तींसाठी सर्रास वापर सुरू आहे. शाडूची माती महाग पडत असल्याने काही मूर्तिकारांनी लाल चिकनमातीचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. मातीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती वाळण्यास जास्त दिवस जात असल्यामुळे मूर्तिकार सध्या कामात व्यस्त दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)