टी. जे. कंपनीच्या ड्रायरमध्ये दाेन कामगार अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:40 IST2021-04-30T04:40:51+5:302021-04-30T04:40:51+5:30

रत्नागिरी : मच्छी सुकवण्याचा ड्रायर साफ करत असताना ताे अचानक सुरू झाला आणि २ कामगार त्यामध्ये चिरडल्याची घटना रत्नागिरी ...

T. J. Daen workers got stuck in the company's dryer | टी. जे. कंपनीच्या ड्रायरमध्ये दाेन कामगार अडकले

टी. जे. कंपनीच्या ड्रायरमध्ये दाेन कामगार अडकले

रत्नागिरी : मच्छी सुकवण्याचा ड्रायर साफ करत असताना ताे अचानक सुरू झाला आणि २ कामगार त्यामध्ये चिरडल्याची घटना रत्नागिरी शहरानजीकच्या एमआयडीसीतील टी. जे. मरिन कंपनीत गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.

संतोष विश्राम घवाळी (३७, रा. पानवल, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे तर त्याचा दुसरा सहकारी सुमित अनंत पांचाळ (२५, रा. कुवारबांव) हा गंभीर जखमी झाला आहे. संताेष घवाळी आणि सुमित पांचाळ हे दाेघे गुरुवारी सायंकाळी कंपनीतील मच्छी सुकवण्याचा ड्रायर साफ करत हाेते. हे काम करत असतानाच अचानक ड्रायर सुरू झाला आणि त्यात संताेष घवाळी ओढला गेला. ड्रायरमध्ये अडकल्याने त्याच्या शरीराच्या अर्ध्या भागाचा चेंदामेंदा झाला तर सुमित पांचाळ यांच्या पायाला इजा झाली.

या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संतोष घवाळी याचा मृतदेह कापडात बांधून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. पाेलीस निरीक्षक विनीत चाैधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Web Title: T. J. Daen workers got stuck in the company's dryer