शहरं
Join us  
Trending Stories
1
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
2
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
3
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
4
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
6
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
7
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
8
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
9
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
10
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
11
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
12
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
13
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
14
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
15
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
16
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
17
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
18
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
19
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
20
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

औषधनिर्माण शास्त्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2017 20:02 IST

फार्मसीच्या प्रवेशाला १७ जूनची ह्यडेडलाईनह्ण: आॅनलाईन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ

ब्रम्हानंद जाधव/ बुलडाणा
राज्यातील सरकारी व विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील बी. फार्मसी व डी.फार्मसी प्रथम वर्ष २०१७-१८ च्या अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतीम मुदत १७ जून असून  औषधनिर्माण शास्त्राच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येत आहे.
उच्च माध्यमिक शिक्षणाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया बारावीच्या निकालाच्या गुणपत्रिका (हार्ड कॉपी) मिळाल्यानंतरच सुरू होतात. बारावीचा निकाल ३० मे रोजी विद्यार्थ्यांच्या हातात पडताच विज्ञान, कला आणि वाणिज्य या पारंपरिक विद्याशाखांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष प्रवेशाचे वेध लागले. निकालानंतर दुसऱ्याच आठवड्यापासून विविध विद्याशाखांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी महाविद्यालयांनीही तयारी पूर्ण केली असून, अनेक महाविद्यालये यंदा आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवित आहेत. बारावी विज्ञानशाखेनंतर औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमामध्येही दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये डी.फार्मसी हा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम असून औषध उत्पादन, संशोधन, गुणवत्ता नियंत्रण, विक्री व विपणन, हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसी यामध्ये करिअर करता येऊ शकते. त्यानंतर बी.फार्मसी ही पदवी घेता येते. राज्यातील सरकारी व विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील बी. फार्मसी व डी.फार्मसी प्रथम वर्ष २०१७-१८ च्या अभ्यासक्रमासाठी ६ जूनपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. औषधनिर्माण शास्त्राच्या या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतीम मुदत १७ जून देण्यात आली असून, यावर्षी या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येत आहे.  आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या महाविद्यालयांकडून महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर सुद्धा अर्ज अपलोड केले जात आहेत. त्यानंतर आलेल्या अर्जांप्रमाणे गुणवत्ता यादी तयार करून, त्यानुसार प्रवेश दिले जाणार आहेत.


ग्रामीण भागातही पोहचले फार्मसीचे जाळे
औषधनिर्माण शास्त्र पदवी (बी फार्म) आणि औषधनिर्माण शास्त्र पदविका (डी फार्म) महाविद्यालयाचे ग्रामीण भागातही जाळे पसरले आहे. महाराष्ट्र शासनाने बी. फार्मसी आणि डी. फार्मसी महाविद्यालये सुरु करण्यासाठी अनेक ठिकाणी मान्यता दिली आहे. तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली आणि फार्मसी कौन्सिल आॅफ इंडिया या शिखर संस्थांची देखील राज्यातील काही औषध निर्माण शास्त्राच्या महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. मोठ्या संस्थांची मान्यता मिळत असल्याने  राज्यातील बी.फार्मसी व डी.फार्मसी महाविद्यालयांच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे.