शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनात राज्य शासनाची झोप उडवणार

By admin | Updated: November 19, 2015 00:43 IST

संजय कदम : शिक्षण बचाव समितीच्या आंदोलनाला पाठिंबा

दापोली : शिक्षणाची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव समितीने हाती घेतलेल्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा आहे. नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनात याबाबत जाब विचारून शासनाची झोप उडवणार असल्याचे दापोली, खेड मंडणगडचे आमदार संजय कदम यांनी सांगितले. शिक्षण बचाव समितीतर्फे ‘झोपमोड आंदोलन’ पुकारण्यात आले आहे. या आंदोलना दरम्यान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय कदम यांच्या घरी भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की, शासनाकडून संभ्रमावस्था निर्माण करणारे आदेश काढले जात आहेत. यातून शिक्षण क्षेत्राचे अतोनात नुकसान होणार आहे. विधानसभेत याच्या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. याकरीता लोकप्रतिनिधींना रात्री ११ नंतर झोपेतून उठवून निवेदन सादर करण्याबाबतचे आंदोलन राज्यभर राबवण्यात आले होते. शिक्षण बचाव समितीमार्फत आमदार संजय कदम यांना रात्री ११.३० वाजता त्यांच्या निवासस्थानी हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी हा प्रश्न शासनदरबारी मांडण्याची विनंती कदम यांना करण्यात आली. सध्याचे शासन ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवून जनतेची दिशाभूल करत आहे. नुसत्या वल्गना करून निद्रीस्त राहण्यात धन्यता मानणाऱ्यांची झोप उडवण्याची वेळ आता आली आहे. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शैक्षणिक धोरणाबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी आपण नक्कीच आवाज उठवू, असे कदम यांनी सांगितले. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे कार्यकारणी सदस्य संदेश राऊत, दापोली तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल देसाई, सहसचिव किशोर नागरगोजे, सल्लागार शामराव पवार आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)