शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

टपाल कर्मचारी २ रोजी संपावर

By admin | Updated: August 30, 2015 00:33 IST

विविध मागण्या : केेंद्र शासनाच्या धोरणावर केली टीका

रत्नागिरी : टपाल कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या २ सप्टेंबरला लाक्षणिक संपाचा निर्णय घेतला असल्याचे नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉईजने जाहीर केले आहे. सध्याच्या सरकारने कामगारविरोधी व जनविरोधी धोरणांचा तडाखा सुरू केला आहे. कामगारांनी संघर्ष करून मिळविलेल्या संघटनात्मक तरतुदी, पगार, सामाजिक न्याय आदींबाबत सरकारने विरोधी भुमिका स्वीकारली आहे. यामुळे भांडवलदारांना सरकारचा पाठिंबा मिळत असल्याचा आरोप पोस्टल कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. सत्तेवर आल्यानंतर सरकार अच्छे दिन आयेंगे, महागाई कमी करू , रोजगार निर्मिती करू ही सर्व आश्वासने विसरले आहे. महागाईचा आलेखही चढता असल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन पेन्शन योजना अडचणीची आहे. मात्र, त्यात बदल करण्यास सरकार तयार नाही. केंद्रीय कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्याचे विलीनीकरण, अंतरीम वाढ, सातवे पे कमिशन सन २०१४पासून लागू करण्यास सरकारने नकार दर्शविला आहे. डाक विभागाने तसेच सरकारने ग्रामीण डाकसेवक कर्मचाऱ्यांचा सातव्या पे कमिशनमध्ये समावेश केलेला नाही. त्यामुळे आता सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांनी दि. २ सप्टेंबर रोजी लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. हा संप सर्व टपाल कर्मचाऱ्यांनी यशस्वी करून दाखवावा, असे आवाहन नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज पोस्टमन अँड ग्रुपचे सचिव व्ही. एस. लिंगायत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)