Ratnagiri: घरगुती वादातून सख्ख्या भावाला चाकूने भोसकले, काजीर्डा राणेवाडी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 12:45 IST2024-09-21T12:44:48+5:302024-09-21T12:45:07+5:30

राजापूर : घरगुती वादातून रागाच्या भरात सख्ख्या भावाला सुरीने भोसकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला केल्याची घटना राजापूर तालुक्यातील ...

stabs brother in domestic dispute, incident at Kazirda Ranewadi Ratnagiri | Ratnagiri: घरगुती वादातून सख्ख्या भावाला चाकूने भोसकले, काजीर्डा राणेवाडी येथील घटना

Ratnagiri: घरगुती वादातून सख्ख्या भावाला चाकूने भोसकले, काजीर्डा राणेवाडी येथील घटना

राजापूर : घरगुती वादातून रागाच्या भरात सख्ख्या भावाला सुरीने भोसकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला केल्याची घटना राजापूर तालुक्यातील काजीर्डा राणेवाडी येथे घडली. यामध्ये शांताराम राणे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राजापूर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजीर्डा राणेवाडी येथील बाळकृष्ण आत्माराम राणे (वय ७२) आणि त्यांचा सख्खा भाऊ शांताराम आत्माराम राणे (५६) यांच्यात काल, शुक्रवारी दुपारच्या सुमारास घरगुती कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका शिगेला पोहोचला की बाळकृष्ण यांनी रागाच्या भरात शांताराम यांना सुरीने भोसकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शांताराम राणे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी रामचंद्र चंद्रकांत अर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळकृष्ण राणे यांच्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १०९ प्रमाणे राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: stabs brother in domestic dispute, incident at Kazirda Ranewadi Ratnagiri