शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील स्कायवॉक प्रकल्प अधांतरी

By admin | Updated: January 30, 2015 23:12 IST

ठेकेदारच मिळेना : दीड वर्षांपूर्वी मिळाली मंजुरी; दोन कोटी रूपये पडून

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील माळनाका येथील गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा ये-जा करण्यासाठी मंजूर झालेला स्कायवॉक अद्याप रखडला आहे. दीड वर्षापूर्वी मंजूर झालेल्या व २ कोटी १० लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची निविदाच कोणी भरत नसल्याने हे काम कसे होणार, याबाबत आता संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. काही वर्षांपूर्वी माळनाका येथे एका अपघातात शाळकरी मुलीचे निधन झाले होते. या भागात पेट्रोलपंप, शाळा तसेच एस. टी. डेपो असल्याने कायम गर्दी व वाहनांची वर्दळही मोठी असते. त्यामुळे विद्यार्थी व पादचारी यांना रस्ता ओलांडणे कठीण होते. परिणामी याठिकाणी होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही जास्त आहे. सकाळी व सायंकाळी याठिकाणी असलेल्या बसथांब्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. त्यामुळेही अपघातांची शक्यता असल्यानेच येते स्कायवॉक असावा, अशी कल्पना पुढे आली. त्यातूनच लोकप्रतिनिधींनी हा स्कायवॉकचा प्रकल्प येथे मंजूर करून घेतला.दीड वर्षापूर्वी मंजूर झालेल्या या स्कायवॉकला २ कोटी १० लाख रुपये खर्च येणार आहे. माळनाका येथील एस. टी. डेपो ते वायंगणकर रेस्टॉरंटसमोरील जागेपर्यंत हा ५७ मीटर्सचा स्कायवॉक प्रकल्प आहे. याआधी दोनवेळा निविदा काढण्यात आल्या. परंतु त्या भरण्यात कोणीही स्वारस्य दाखविले नाही. आता तिसऱ्या वेळी या कामाची निविदा काढण्यात आली असून, त्यालाही कोणाचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे स्कायवॉकबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अतिगर्दीच्या ठिकाणी पादचाऱ्यांना ये जा करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला हा प्रकल्प रखडल्याने या प्रकल्पाबाबत ये रे माझ्या मागल्या असेच झाले आहे. (प्रतिनिधी)ठेकेदारच मिळत नाहीत?जिल्ह्यात रस्त्यांवर कोठेही स्कायवॉक नाहीत. रत्नागिरीतील हा पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे अशा प्रकल्पाचे काम करणारे ठेकेदार जिल्ह्यात नसल्याने व मोठ्या शहरातील ठेकेदार छोट्या स्कायवॉक प्रकल्पासाठी रत्नागिरीत येण्यास राजी नसल्याने स्कायवॉक प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी आहे.