Mayor's post reservation: रत्नागिरी जिल्ह्यात महिला राज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:16 IST2025-10-07T14:16:27+5:302025-10-07T14:16:46+5:30
रत्नागिरी : गेली तीन वर्षे नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका प्रलंबित राहिल्या होत्या. आता त्यातील नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर ...

Mayor's post reservation: रत्नागिरी जिल्ह्यात महिला राज
रत्नागिरी : गेली तीन वर्षे नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका प्रलंबित राहिल्या होत्या. आता त्यातील नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले असून, जिल्ह्यातील आठपैकी सहा नगराध्यक्ष पदे महिला राखीव झाली आहेत. एक नगर परिषद आणि एका नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण म्हणून खुले राहिले आहे.
जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड या नगर परिषदा आणि लांजा, देवरुख, गुहागर या नगर पंचायतीची मुदत २०२२ मध्ये संपली आहे, तर दापोली नगर पंचायतीची मुदत पुढील वर्षी संपणार आहे. सोमवारी मुंबईत काढण्यात आलेल्या नगराध्यक्ष आरक्षणात या आठ नगराध्यक्षांचा समावेश होता.
यातील चिपळूण नगर परिषद आणि दापोली नगर पंचायतीचे नगराध्यक्षपद खुले राहिले आहे. रत्नागिरी, राजापूर, खेड या नगर परिषदा आणि लांजा, देवरुख, गुहागर या नगर पंचायतींचे नगराध्यक्ष पद महिला राखीव झाले आहे.