गुहागर (जि. रत्नागिरी) : तालुक्यातील पाटपन्हाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या गोडाऊनमध्ये खतांच्या पोत्यांमध्ये बसलेल्या महाकाय अजगराला श्रृंगारतळी येथील सर्पमित्राने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.गोडाऊनमध्ये सध्या खतांची पोती आहेत. या खतांचे वाटप करावयाचे असल्याने कर्मचारी विनायक जोशी, सचिन कदम व प्रमोद चव्हाण हे पोती बाहेर काढण्यासाठी गेले होते. पोती काढत असताना अचानक त्यांना एक अजगर दिसला. काही पोत्यांभोवती तो वेटोळा करून पडला होता. सुमारे ६ फुटी अजगर पाहून त्यांना चांगलाच धक्का बसला. त्यांनी श्रृंगारतळी येथील सर्पमित्र अरमान मुजावर यांना तातडीने बोलावले. मुजावर यांनी कौशल्याने या अजगराला पकडले व नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
Ratnagiri: पाटपन्हाळेत खताच्या गोदामात सहा फुटी अजगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:49 IST