शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास विक्रमी उत्पादन : शिंदे

By admin | Updated: February 2, 2015 00:14 IST

महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत आठवडा बाजार प्रशिक्षण ग्रामपंचायत, खेर्डी येथे नुकतेच घेण्यात आले.

अडरे : आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन भाजीपाला पिकाचे संगोपन केल्यास कोकणच्या लाल मातीमध्ये या पिकाचे विक्रमी उत्पादन घेता येऊ शकते, असे मत मृदसंधारण संशोधन केंद्र, आवाशी (ता. खेड) येथील प्रभारी अधिकारी डॉ. वैभव शिंदे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत आठवडा बाजार प्रशिक्षण ग्रामपंचायत, खेर्डी येथे नुकतेच घेण्यात आले. यावेळी शिंदे यांनी शेतकऱ्यांना कोकणातील भाजीपाला लागवडीविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी खेर्डी, शिरगाव व मोरवणे परिसरातील शेतकरी गटाचे सभासद उपस्थित होते. पावसाळ्यानंतर कमी कालावधीत कोणती पिके घेणे शक्य आहे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.संपूर्ण कोकणपट्ट्यात येथील बहुतांश शेतकरी वर्षातून भाताचे एकच पीक घेत असतात, तर काहींच्या फळबागा आहेत. परंतु, शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळता राहण्याकरिता सिंचनाची सुविधा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी भात उत्पादनांवर रब्बी व उन्हाळी हंगामात भाजीपाला पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. या उत्पादनाची शेतकऱ्यांनी स्वत: अथवा समूह गटाच्या माध्यमातून थेट विक्री केल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतोे, असे शिंदे म्हणाले. शेतीचे कोणतेही उत्पादन घेताना किंवा विक्री करताना सामुदायिक पध्दत वापरली, तर कमी श्रमात जास्त पैसे मिळतात, असेही ते म्हणाले.कृषी सहाय्यक आर. के. जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेतमाल विक्री व्यवस्थेविषयी मार्गदर्शन केले. पाटील यांनी शेतकऱ्यांना महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळाजी चिले यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी मंडल कृषी अधिकारी महेंद्र धोतरे, कृषी पर्यवेक्षक शांताराम उदेग व कृषी विभागाचे कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. (वार्ताहर)