शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या पोटात धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2016 21:42 IST

भास्कर जाधव : चिखली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता शिबिर

गुहागर : जिल्ह्यात फूट पडली होती, याचा फायदा विरोधकांनी घेतला. आता एकत्र आलेला, एकसंघ झालेला राष्ट्रवादी पक्ष बघून विरोधकांच्या पोटात धडकी बसल्याशिवाय राहणार नाही, जिल्हा परिषदेबरोबरच पुढच्या वेळी खासदारही राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असा विश्वास आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला. चिखली येथील ओंकार मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता शिबिर सांगता समारंभात ते बोलत होते. जाधव म्हणाले, २० वर्षांपूर्वी सेनेची लाट होती. पण, त्याआधी काँग्रेसची लाट होती हे विसरू नये. चांगले काम केले तर बदल होऊ शकतो. गुहागर व दापोलीमधून अशा प्रकारे घडवून आणलेला बदल तुमच्यासमोर आहे. माणसं बदलून पक्षाचं काम वाढलं नसतं. पुन्हा एकदा जुन्या कार्यकर्त्यांना साद घाला. त्यांच्या मनात विश्वास निर्माण केलात, तर सर्वत्र सत्ता येऊ शकते. दिलेला शब्द पाळणं, ही राजकारणातील माझी ताकद आहे. मागील निवडणुकीत पक्ष एकसंघ नव्हता, म्हणून खासदार आपल्या पक्षाचा होऊ शकला नाही. तानाजीराव चोरगे, बाबाजी जाधव, शेखर निकम हे सर्व माझ्याबरोबर असतील तर कोणालाही शह देऊ शकतो. रमेश कदमांची समजूत काढणं आपल्या समजुतीपलीकडचे असल्याचे ते म्हणाले. सचिव विनायक मुळे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, प्रांतिक सदस्य बाबाजी जाधव, विक्रांत जाधव, सिकंदर जसनाईक, नेत्रा ठाकूर, चित्रा ठाकूर, जयदेव मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विलास वाघे, सुनील जाधव, उपस्थित होते. (प्रतिनिधी) सुरक्षित मतदारसंघ : युवकांना प्राधान्य जिल्ह्यात गुहागर हा सुरक्षित मतदारसंघ म्हणून पाहिला जात आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी विद्यार्थी संघटनेच्या कामाचे कौतुक करुन आगामी काळात ७० टक्के युवकांना प्राधान्य द्या, असे सांगितले आहे. जिल्ह्यात पक्षाच्या सर्वाधिक आमदारांनी निवडणूक लढवावी, असे सुचित केले. बाप्पा सावंत यांनीही भाषणातून याला दुजोरा दिला. मात्र, यावर जाधव यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही.