शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

शालेय कामकाज आठ तासावर

By admin | Updated: November 15, 2015 23:56 IST

शिक्षणमंत्र्यांचा निर्णय : विद्यार्थी वेठीस

आनंद त्रिपाठी - वाटूळ==आरटीई अ‍ॅक्टनुसार राज्यातील १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहा तासांऐवजी ८ तासांचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाच्या शालेय विभागाकडून सूचना मागविण्यात येत आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या या निर्णयाला राज्यातील सर्वच शिक्षक संघटनांकडून कडाडून विरोध होत आहे.एकीकडे आनंददायी शिक्षण, दप्तराचे ओझे कमी करणे यासाठी शासन प्रयत्न करत असताना किशोरवयीन खेळण्या - बागडण्याच्या वयातील विद्यार्थ्यांची आठ तास शाळा घेऊन त्यांना वेठीस धरले जाणार आहे. आधीच दप्तराचे ओझे त्यामध्ये प्रोजेक्ट, स्वाध्याय, उपक्रम, निबंध, तोंडी परीक्षा, सहामाही परीक्षा, स्कॉलरशिप, शाळाबाह्य परीक्षा यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, शारीरिक क्षमतांना न्याय मिळणार आहे का? शिक्षण फक्त शाळेतूनच मिळत नाही तर शाळेच्या बाहेरील शिक्षणही महत्वाचे असते. या बाबींचा विचार शासनाच्या शिक्षण धोरणामध्ये दिसत नाही. एकीकडे कला व क्रीडा विषयाच्या तासिका रद्द करुन ८ तासांच्या शाळेतून विद्यार्थ्यांवर कसले संस्कार घडवायचे आहेत असा सवाल काँग्रेस शिक्षक सेलचे उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी विचारला आहे.ऐन दिवाळीच्या सुट्टीत घाईगडबडीने विचार करायला वेळ न देता हे धोरण जाहीर करण्यात आले. तसेच राजभाषा मराठी असलेल्या महाराष्ट्रात या धोरणावर सूचना मागवायच्या त्याही इंग्रजीमध्ये हा मोठा विरोधाभास असल्याचे सुळे यांनी सांगितले.एकंदरीतच सहा तासांऐवजी ८ तासांच्या शाळेमुळे विद्यार्थ्यांसाठी शाळा ही कोंडवाडा ठरेल, अशी भिती पालकांमधून व्यक्त होत आहे. मागील ४ वर्षापासून शिक्षक भरती बंद आहे. कोकणातील अनेक शाळांमध्ये शिक्षक कमी असल्याने त्याचा अध्यापनावर परिणाम होत आहे. अन् अशातच ८ तासांची शाळा झाल्यानंतर वाढलेल्या दोन तासांचे अध्यापन कोण व कसे करणार? अशा अनेक शंका शिक्षकवर्गातून उपस्थित होत आहेत.विद्यार्थ्यांचा विचार : धोरण मनस्तापदायकवातानुकुलीत कार्यालयात बसून सदर धोरण तयार करणाऱ्या शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही विचार करावा. एक तासाची पायपीट करुन शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे धोरण मनस्तापदायक आहे. त्यामुळे सदर नियमाची प्रत्यक्ष कार्यवाही कितपत होईल याबाबत साशंकता आहे. - रमेश जाधव, जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषद, रत्नागिरी.शिक्षकांची नाराजीशालेय कामकाज सहा तासावरून आठ तास करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.