शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दमदार गर्जना

By admin | Updated: September 16, 2015 00:48 IST

रत्नागिरी जिल्हा : उत्सवी वातावरणाला मुसळधार सरींनी आणला उत्साह

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून परतीच्या पावसाने पुन्हा दमदार सलामी दिली असून, रात्रीपासून संततधार सुरू आहे. आज (मंगळवार) दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गुरुवारपासून परतीच्या पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने सोमवारी सायंकाळपासून मेघगर्जनेसह जोरदार सुरुवात केली आहे. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. सकाळी थोड्याशा विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सुरू झाला. शहरातील अनेक भागात गटारांचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करीतच वाहने चालवावी लागत होती. सकाळी सुमारे दीड तास शहरातील वीजपुरवठा गायब होता. दुपारनंतर मात्र थोडीशी उघडीप घेतली होती. त्यामुळे तासभर नागरिकांना सूर्यदर्शनही झाले. सायंकाळी पुन्हा पावसाने जोर धरला होता. आज दिवसभर पावसाचे रिमझिम, तर मध्येच मुसळधार बरसणे सुरूच होते. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. गतवर्षी या दिवशी २.४८ मिलीमीटर इतका पाऊस झाला होता, तर आज २३.८३ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला. मात्र, गतवर्षी या दिवशी झालेल्या एकूण पावसाची नोंद ३३२३.३३ मिलिमीटर होती. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने १ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाची केवळ २०३५ मिलिमीटर इतकीच नोंद झालेली आहे. परतीचा पाऊस सलग चार दिवस मुसळधार पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला असला तरी आतापर्यंत सरासरी सुमारे १३०० मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे यावर्षी लवकरच पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)