शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचितगडावर जाणारा मार्ग हाेणार सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST

देवरूख : संगमेश्वर तालुक्याचे वैभव म्हणून ओळखला जाणारा सह्याद्रीचा मुकुटमणी प्रचितगडावर जाणाऱ्या शिडीची दुरवस्था झाली आहे. ही शिडी जीवघेणी ...

देवरूख : संगमेश्वर तालुक्याचे वैभव म्हणून ओळखला जाणारा सह्याद्रीचा मुकुटमणी प्रचितगडावर जाणाऱ्या शिडीची दुरवस्था झाली आहे. ही शिडी जीवघेणी ठरत असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांना मिळताच शिडीच्या दुरुस्तीसाठी क वर्ग पर्यटनामधून १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच रस्त्यासाठीही १० लाख रुपये मंजूर केल्याचे सांगितले.

प्रचितगडावर नेणारी ही शिडी दोन टोकांना जोडण्याचे काम करते. पूर्वी येथे दगडी जिना होता. मात्र, त्याच्या पायऱ्या ढासळल्यामुळे अनेक वर्षे गडावर जाताच येत नव्हते. अखेरीस इतिहासप्रेमींनी अथक प्रयत्नांनंतर गडावर जाण्यासाठी शिडी बसविली हाेती. त्यामुळे गिर्यारोहक तसेच पर्यटकांना गडावर जाणे साेपे झाले हाेते. गेल्या काही वर्षांत ऊन, पाऊस आणि वारा यामुळे ही शिडी गंजू लागली आणि एक - एक करत नेमक्या सुरुवातीच्याच सहा पायऱ्या तुटून दरीत पडल्या. सद्य:स्थितीत पायऱ्या मोडून पडलेल्या असतानाच शिवप्रेमी या धोकादायक शिडीवरून गडावर जा-ये करत असून, हा प्रकार जीवघेणा ठरू शकतो. आमदार शेखर निकम यांनी क वर्ग पर्यटनातून जुन्या शिडीच्या दुरुस्तीऐवजी थेट नवीन शिडी बसविण्यासाठी तब्बल १० लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. गडाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठीदेखील प्राथमिक स्थितीत १० लाख रुपये मंजूर करून घेतले आहेत. आमदार निकम यांनी प्रचितगडाबाबत स्वतः लक्ष घालून कार्यवाही केल्याने शृंगारपूर येथील ग्रामस्थ विनोद म्हस्के, विनायक म्हस्के, सुशांत कोळवणकर, फणसवणे येथील सत्यवान विचारे यांनी समाधान व्यक्त केले.

---------------------------

निविदा निघाल्या

प्रचितगडावर जाण्यासाठी नवीन शिडी बसविणे आणि प्राथमिक स्तरावर रस्ता करणे यासाठी आमदार शेखर निकम यांनी केवळ २० लाखांचा निधी मंजूर करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी याबाबत तातडीने निविदाप्रक्रिया करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्याने याबाबतची रीतसर निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्याने लवकरच प्रत्यक्ष कामालादेखील सुरुवात होणार आहे.

---------------------------

चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्वच ऐतिहासिक स्थळांचे जतन करायला हवे. संगमेश्वर तालुक्यातील प्रचितगड ही केवळ कोकणची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची शान आहे. क वर्ग पर्यटनामधून शिडी आणि रस्त्यासाठी तब्बल २० लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. प्रचितगड विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याकरिता आपण पाठपुरावा करत राहू.

- शेखर निकम, आमदार