शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हा रस्ता की फुटपाथ?

By admin | Updated: July 6, 2014 23:54 IST

पेव्हर ब्लॉक : कामाच्या दर्जाबाबत सुरू झाली चर्चा...

उमेश पाटणकर _ रत्नागिरी  आठवडा बाजारात एका चौकात पाणी साचते म्हणून बसविण्यात येत असलेले पेव्हर ब्लॉक पाहता हा रस्ता की फुटपाथ? असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे. पेव्हर ब्लॉकची जाडी पाहता हे काम किती दिवस टिकेल, याबाबत शंकाच आहे.सांडपाण्याचा निचरा होण्याची योजना शहरात कोलमडलेली आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी शहरातील असलेली गटारे साफ करणे, पुनर्बांधणी करणे अशा कामांकडे लक्ष देण्याऐवजी रत्नागिरी नगरपरिषदेने ज्या रस्त्यांवर पाणी साठले ते त्या ठिकाणी रस्ते उखडू नयेत म्हणून पेव्हर ब्लॉक बसवण्याची योजना आणली आहे. प्रायोगिकतत्त्वावर रत्नागिरी बसस्थानकमार्गे मिरकरवाडाकडे जाणाऱ्या ८० फुटी रस्त्यावर आठवडा बाजार येथील कै. सतीश साळवी चौकात हे पेव्हर ब्लॉक बसवण्यात येत आहेत. या ब्लॉकचा दर्जा पाहता भररस्त्यात फुटपाथ कशासाठी उभारला जातोय? असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे. या रस्त्यालगतची सर्व गटारे बुजल्यामुळे पावसाच्या पाण्यासह सर्व सांडपाणी या परिसरात साठून राहाते. त्यामुळे पावसाळ्यात चौकातील डांबरीकरण पूर्णत: उखडते. वारंवार करावे लागणारे डांबरीकरण टाळण्यासाठी गटारांची खोदाई न करताच नगरपरिषदेने या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्याचा निर्णय घेतला. सध्या हे काम प्रगतीपथावर असून, रस्त्याच्या एका बाजूचे पेव्हर ब्लॉक बसवून झाले आहेत. दोन दिवसांच्या वाहतुकीमध्ये यातील अनेक पेव्हर ब्लॉक उखडले आहेत, तर काही ब्लॉक तुटले आहेत. सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी येथे जांभ्या दगडाचा भराव करुन रस्त्याची उंची एक फुटाने वाढवण्यात आली आहे. त्यावर काँक्रिटीकरण केले असून, ब्लॉक बसवले जात आहेत. ब्लॉकसाठी क्राँक्रिट बेड न घालता ग्रीड पसरुन सीमेंट पावडर टाकून पेव्हर ब्लॉक बसवले जात आहेत. यामुळे हे पेव्हर ब्लॉक किती दिवस टिकणार हा प्रश्नच आहे.याबाबत आश्फाक शेख या रिक्षा व्यावसायिकाने सांगितले की, ही केवळ धूळफेक आहे. पाणी साचून रस्ते बाद होतात म्हणून परिसरातील गटारे साफ केली असती तर पाण्याचा प्रश्न सुटला असता. जांभा दगड टाकून केवळ काँक्रिटीकरण केले असते तरी चांगले टिकले असते. फूटपाथसाठी वापरायचे पेव्हर ब्लॉक अवजड वाहतुकीचा दाब किती सहन करणार? आठवडाबाजारमध्ये करण्यात आलेले पेव्हरब्लॉकचे काम त्याच्या दर्जामुळे चर्चेत आले आहे. या कामाबाबत वाहनचालकांनी व्यक्त केलेली नाराजी बोलकी आहे.पेव्हर ब्लॉक..रत्नागिरी नगरपरिषदेने पेव्हर ब्लॉकचे काम हाती घेतले. येथील आठवडा बाजारात चौकात पाणी साठू नये, पाण्याचा निचरा योग्य पध्दत्तीने व्हावा, रस्ते उखडू नयेत यासाठी अशा माध्यमाचा वापर केला जातो. येथे तसाच प्रयत्न केला जात आहे.मात्र या कामाच्या दर्जाबाबत अनेकांनी शंका व्यक्त केली . शहरातील पेव्हरब्लॉकचे काम पूर्ण होईल तेव्हा नागरिकांचे समाधान होईल काय असा प्रश्न पडला आहे. सांडपाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी येथे जांभा दगडाचा भराव करून रस्त्याची उंची १ फुटाने वाढविण्यात आली आहे. ब्लॉक बसविण्यात आले असले तरी त्यासाठी काँक्रिट बेड घातले नसल्याचे निष्पन्न झाले आहे.