शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात मृतांच्या संख्येतील वाढ चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST

राजापूर : राजापूर तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील दोन दिवसांमध्ये तब्बल ८३ रुग्णांची भर पडली आहे. वाढत्या ...

राजापूर : राजापूर तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील दोन दिवसांमध्ये तब्बल ८३ रुग्णांची भर पडली आहे. वाढत्या संख्येबरोबरच बाधितांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ होत असल्याने चिंता व्यक्‍त केली जात आहे.

राजापूर तालुक्‍यात कोरोनाचा कहर सुरू असून, सद्यस्थितीत कोरोनाचा आकडा हजाराच्या दिशेने सरकत आहे. तालुक्‍यात आजपर्यंत ९२७ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये ४७६ रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून, ४१२ रुग्ण उपचार घेत आहेत. ३९ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ॲक्टिव्ह रुग्णांपैकी ३०० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रायपाटण कोविड सेंटरमध्ये ५४ रुग्ण दाखल आहेत. जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ३० असून, जिल्ह्याबाहेरील खासगी रुग्णालयात १७ तर तालुक्‍याबाहेर ११ जण उपचार घेत आहेत.

तालुक्‍यात रुग्णसंख्या वाढत असताना कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. तालुक्‍यात राजापूर व रायपाटण अशी दोन ग्रामीण रुग्णालये असून, नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. आजपर्यंत सर्वांत जास्त रुग्ण व सर्वात जास्त मृत्यू करक प्राथमिक रुग्णालयांतर्गत निष्पन्न झाले आहेत. कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी आहे. तालुक्‍यात २३६ गावे असून, यापैकी ८१ गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. उर्वरित गावांनी अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळविले आहे.