शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

हेल्पिंग हँडस्च्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST

रत्नागिरी : येथील हेल्पिंग हँडस्च्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर उत्तम प्रतिसादात पार पडले. शहराच्या जयस्तंभ भागातील गीता भवन ...

रत्नागिरी : येथील हेल्पिंग हँडस्च्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर उत्तम प्रतिसादात पार पडले. शहराच्या जयस्तंभ भागातील गीता भवन येथे बुधवारी (दि. ८) हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी या शिबिराला भेट देऊन कार्यकर्त्यांचे व रक्तदान करणाऱ्यांचे कौतुक केले.

जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर सर्वच रक्तगटांचा तुटवडा जाणवत आहे. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या विविध रुग्णांची संख्या लक्षात घेता, सध्या या रुग्णालयात विविध गटांच्या रक्ताची मागणी वाढली आहे. मात्र, सध्या कोरोनाने बाधित होणाऱ्यांची वाढती संख्या आणि लसीकरण प्रक्रिया याचा परिणाम रक्तसंकलनावर होत आहे. अनेक दाते कोरोनाबाधित झाले. त्यामुळे त्यांना तीन महिन्यांच्या आत रक्तदान करता येत नाही. तसेच पहिला किंवा दुसरा कोरोना प्रतिबंधक डोस घेतल्यानंतर १४ दिवसांच्या आत रक्तदान करता येत नाही.

सध्या बाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, सध्या लसीकरणाचा वेग जिल्ह्यात वाढला आहे. त्यामुळे १८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. त्यामुळे या दात्यांना इच्छा असूनही १४ दिवसांच्या आत रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्याही घटली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीला सध्या रक्तगटांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासू लागला आहे.

त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डायलिसिस शस्त्रक्रिया, अपघाती रुग्ण, विविध शस्त्रक्रिया, प्रसूती, थॅलेसिमिया, हिमोफिलियाचे रुग्ण, आर्थिक दुर्बल घटक, ज्येष्ठ नागरिक रुग्ण, आदींना पुरवठा करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे हेल्पिंग हँडस्च्या कार्यकर्त्यांनी बुधवारी गीता भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यात कार्यकर्त्यांनीही रक्तदान केले. रक्तदात्यांना हेल्पिंग हँडस्कडूनही प्रमाणपत्र देण्यात आले.

जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी या रक्तदान शिबिराला भेट दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने हेही होते. यावेळी डाॅ. पाटील यांनी हेल्पिंग कार्यकर्त्यासाेबत विविध समस्यांवर चर्चा केली.