शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याच्या धुरात जलशुुध्दिकरण !

By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST

रत्नागिरी नगरपरिषद : धुरामधील कचऱ्यातच पाणी स्वच्छ करण्याचा उपद्व्याप

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणी योजनेसाठी साळवी स्टॉप येथे उभारलेल्या जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारातच कचऱ्याच्या ढीगांना आग लावून देण्याचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे शहरातील ९० टक्के भागासाठी लागणाऱ्या पाण्याचे शुध्दिकरण हे कचऱ्याच्या धुरामध्येच होत असून, याच पाण्याचा शहरातील नागरिकांना पुरवठा केला जात आहे. त्यामुळे हे पाणी खरोखरच शुध्द स्वरुपात लोकांना मिळते का, असा प्रश्न आता शहरवासीयांमध्येच निर्माण झाला आहे. साळवी स्टॉप येथील प्रकल्पात शीळ धरणातून येणाऱ्या पाण्याचे शुध्दिकरण केले जाते. मात्र, येथील जलशुध्दिकरण टाकीच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य आहे. कचऱ्याचे ढीग तयार झाल्याने या भागाला उकिरड्याचे रुप आले आहे. या सुक्या व ओल्या कचऱ्याच्या ढिगांमध्ये पाळीव जनावरांचा सततचा धुमाकूळ असतो. त्याशिवाय कावळे व बगळे यांचे प्रमाणही या उकिरड्यावर अधिक आहे. कुत्र्यांचे तर या भागात पीक आले आहे. कावळे व अन्य पक्षी येथील मरून पडणाऱ्या उंदिर, घुशी उचलून नेतात व शेजारीच असलेल्या पाणी टाकीच्या कठड्यावर बसतात, असे चित्र नेहमीच पाहायला मिळते. त्यामुळे कचरा, घाण टाकीत जाण्याची शक्यता नेहमीच असते. परिणामी पाण्यात घाण पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणती दक्षता घेण्यात आली आहे काय, असा सवाल नागरिकांतूून विचारला जात आहे. कचऱ्याचे ढीग दररोज पेटवले जात असल्याने जलशुध्दिकरणचा परिसर गडद धुराने भरून जातो. तसेच कचरा पेटताना त्यातील काही भाग जळून हवेत तरंगत राहतो, पाण्याच्या टाकीतही हा जळालेला कचऱ्याचा भाग पडतो. त्यामुुळे रत्नागिरीकरांना खऱ्या अर्थाने पिण्याचे शुध्द पाणी मिळायला हवे असेल तर या ठिकाणी असलेल्या कचऱ्यासाठी नवीन जागा शोधणे आवश्यक आहे. तसेच येथील कचऱ्याचे ढीग पेटवण्यापेक्षा कचरा त्याच भागात पुरणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)


घोषणांचा झालाय सुकाळ...
दांडेआडोमपासून ते पालिकेच्या प्रत्येक प्रभागात घनकचरा प्रकल्प उभारण्याची घोषणा, नंतर अपार्टमेंटमध्ये कचऱ्याचे कंपोस्ट खत बनविणारी यंत्रणा बसविणे यांसारख्या अनेक घोषणा पाहता या घोषणांचा सुकाळ झाला आहे. प्रत्यक्षात कचऱ्याची समस्या अजूनही कायम आहे. यावर कधी आणि केव्हा उपाय योजना करणार असा प्रश्न आहे.