शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

रत्नागिरी : धरणामुळे सुटला गुहागरचा पाणीप्रश्न, वर्षभर पिण्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 4:37 PM

गुहागर शहर व आजूबाजुच्या ग्रामपंचायतींना वर्षभर पिण्याचे पाणी पुरविण्याचे काम अप्रत्यक्षपणे मोडकाघर धरण सध्या करीत आहे.

ठळक मुद्दे धरणामुळे सुटला गुहागरचा पाणीप्रश्न, वर्षभर पिण्याचे पाणी गेल्या ४५ वर्षात धरणातील गाळ जैसे थे; अद्याप उदासीनता

गुहागर : गुहागर शहर व आजूबाजुच्या ग्रामपंचायतींना वर्षभर पिण्याचे पाणी पुरविण्याचे काम अप्रत्यक्षपणे मोडकाघर धरण सध्या करीत आहे.

कमी पावसामुळे भविष्यात दुष्काळासारख्या गंभीर संकटापासून हे धरण महत्त्वाची भूमिका बजावू शकते, हे लक्षात घेता पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्यापासून धरणातील पाणीसाठा व पाण्याची पातळी वाढविण्याकरिता सर्वतोपरी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

यासाठी गेल्या ४५ वर्षात धरणामध्ये साठलेला गाळ उपसण्याची गरज आहे. या कामासाठी तालुका प्रशासनाच्या पुढाकारासह लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा मानला जात आहे.या धरणाचे पाणलोट क्षेत्र ११.६५ चौरस किलोमीटर असूून, उंची तब्बल २० मीटर आहे. या अवाढव्य धरणाची साठवण क्षमता ४४.७० लाख घनमीटर आहे.

वाढत्या शहरीकरणात कालांतराने शेती, भाजीपाला व बागायतीसाठी कालव्याने पाणीपुरवठा करण्याची पद्धत बंद झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या धरणाच्या मुबलक पाणीसाठ्यावर सुरुवातीला तालुक्याचे ठिकाण असलेल्या गुहागर व शेजारच्या असगोली ग्रामपंचायतीने संबंधित खात्याची पूर्वपरवानगी घेऊन धरणाच्या शेजारी विहीर पाडून त्यावर स्वतंत्र जॅकवेल पंप बसवून नळपाणी योजना सुरू केली.त्यानंतर शेजारच्या पाटपन्हाळे, पालशेत व आरे गावांनीही आपापली पाणीयोजना व धरणाच्या बाजूला विहीर उभारून सरू केली. या धरणाच्या उभारणीपासून आजतागायत डागडुजी व दुरूस्तीकरिता कोणताही शासकीय निधी खर्ची पडला नाही.

परंतु सन २०१० - ११ मध्ये धरणाच्या भिंतीमधून लागलेली गळती बंद करण्यासाठी राज्य शासनाने जलसुधारणा प्रकल्पांतर्गत जागतिक बँकेकडून प्राप्त झालेला ९५ लाखांचा भरीव निधी याठिकाणी खर्ची टाकला.परंतु प्रत्यक्षात ही गळती बंद करण्यास संबंधित ठेकेदाराला अपयश आले. त्यामुळे दुरूस्तीवर टाकलेला निधी अक्षरश: वाया गेल्याने वर्षाकाठी साठलेल्या पाण्यापैकी लाखो लीटर पाणी आजही या धरणामधून वाया जात समुद्राला मिळत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते.

त्यामुळे शासनाच्या लघुपाटबंधारे खात्याने पाण्याचे सध्याचे महत्व लक्षात घेता संबंधित कंत्राटदाराकडून ही गळती कोणताही जादा निधी न देता पूर्णत: बंद करून घ्यावी, अशी मागणी गुहागर तालुकावासीयांकडून होत आहे.गेल्या काही वर्षात कमी झालेला पाऊस लक्षात घेता भविष्यात आपणही पाण्याच्या टंचाईपासून निर्माण झालेल्या दृष्टचक्रात सापडल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती आहे.सध्याची वाढती लोकसंख्या, भरमसाठ जंगलतोड, नवे गृह व बंगलो प्रकल्पामुळे वाढलेल्या नवनवीन वस्त्या, गावाकडे होणारे स्थलांतर यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे भीषण संकट आपल्यावरसुद्धा येऊ शकते, हे लक्षात घेऊन आपण आपल्या लाभलेल्या मोडकाघर धरणाची योग्य तऱ्हेने जपणूक व निगा राखून त्यातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कशी वाढविता व कायम राखता येईल, हे पाहणे अत्यावश्यक आहे. संपूर्ण गुहागर शहर आणि परिसराला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा या धरणात उपलब्ध आहे. त्यामुळे हे धरण वरदानच ठरत आहे.गुहागर पर्यटनस्थळ : धरणाची योग्य ती निगा राखण्याची गरजगुहागर शहर व तालुका परिसर आज पर्यटनाचे एक सुंदर ठिकाण म्हणून विकसित होत आहे. हा पर्यटन विकास होत असताना आपल्याकडे असलेला समुद्रकिनारा व प्रेक्षणीय स्थळे जेवढी महत्त्वाची आहेत, तेवढेच आपल्या शहराला मिळणारे मुबलक पाणीही महत्त्वाचे आहे.

शहर परिसराला मुबलक पाणी नसेल तर नुसती प्रेक्षणीय ठिकाणे आणि परिसर असून काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे गुहागरच्या पर्यटन विकासात शहराला कायमस्वरुपी पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.मोडकाघर धरणामध्ये गुहागर तालुकावासीयांची पूर्ण क्षमतेने तहान भागविण्याची ताकद आजही आहे. त्यामुळे या धरणाची डागडुजी करून निगा राखली, तरच पुढची काही वर्षे पाणी मिळू शकेल. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणWaterपाणी