Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 19:34 IST2025-10-14T19:32:50+5:302025-10-14T19:34:09+5:30
खेडमध्ये असलेल्या एका वारकरी गुरूकुलमध्ये शिकायला असलेल्या एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली. संतापजनक बाब म्हणजे कोकरे महाराज आणि शिक्षक कदम यांनीच हे केल्याचा आरोप आहे.

Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या खेड तालुक्यात लोटे येथे आध्यात्मिक वारकरी गुरुकुल आहे. या गुरुकुलामध्ये शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन युवतीसोबत गुरुकुलच्या प्रमुखाने आणि शिक्षकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगवान कोकरे महाराज आणि प्रितेश प्रभाकर कदम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. भगवान कोकरे महाराज हे आध्यात्मिक वारकरी गुरुकुलचे प्रमुख आहेत. तर कदम हे शिक्षक आहेत.
पोलिसांनी दोघांविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यातील कलम १२ व १७, त्याचबरोबर भारतीय न्याय संहितेतील कलम ७४,३५१(३) आणि ८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कोकरे यांच्या या आध्यात्मिक वारकरी गुरुकुलमध्ये अनेक ठिकाणची मुले, मुली शिक्षण घेतात. एका मुलीचा विनंयभग करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कोकरे आणि कदम यांच्यावर आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर लोक संताप व्यक्त करत आहेत.