Ratnagiri: नाहीतर कंबरड्यात मनसेची लाथ बसेल, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा इशारा

By मनोज मुळ्ये | Published: August 27, 2023 12:58 PM2023-08-27T12:58:29+5:302023-08-27T12:59:02+5:30

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका पूर्ण होणे अवघड आहे. पहिले रस्ता करा, नाहीतर तुमच्या कंबरड्यात मनसेची लाथ बसेल, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.

Ratnagiri: MNS leader Sandeep Deshpande warns otherwise | Ratnagiri: नाहीतर कंबरड्यात मनसेची लाथ बसेल, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा इशारा

Ratnagiri: नाहीतर कंबरड्यात मनसेची लाथ बसेल, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा इशारा

googlenewsNext

- मनोज मुळ्ये
रत्नागिरी - गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका पूर्ण होणे अवघड आहे. पहिले रस्ता करा, नाहीतर तुमच्या कंबरड्यात मनसेची लाथ बसेल, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला. रविवारी (२७ आॕगस्ट) मनसेने रत्नागिरी तालुक्यातील निवळी ते वांद्री दरम्यान पदयात्रा काढली. देशपांडे यांच्या भाषणाने या टप्प्यातील यात्रेची सांगता करण्यात आली.

आम्ही लोकांचं काम करतोय, हे आमच्या घरचं काम नाही. त्यामुळे पोलिसांनी सहकार्य करावे, आसेही त्यांनी ठणकावले. मुंबई गोवा महामार्गाचे काम निकृष्ट झाले आहे. गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुम्हाला भ्रष्टाचार करण्यासाठी इथे पाठवले का, असा प्रश्न करत आपल्या जाहीर भाषणात देशपांडे यांनी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला.

महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मनसेने अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा सुरू केली आहे. त्याचे वेगवेगळे टप्पे करण्यात आले आहेत. त्यातील निवळी ते वांद्री पदयात्रा संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली.

Web Title: Ratnagiri: MNS leader Sandeep Deshpande warns otherwise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.