रत्नागिरीच्या रुग्णवाहिकेला अपघात, चालक ठार; मृतदेह घेऊन निघाले होते बिहारकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 15:31 IST2022-06-03T15:31:31+5:302022-06-03T15:31:53+5:30
राजापूर : रत्नागिरीतून बिहारकडे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका ट्रकवर आदळून अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. हा अपघात उत्तर ...

रत्नागिरीच्या रुग्णवाहिकेला अपघात, चालक ठार; मृतदेह घेऊन निघाले होते बिहारकडे
राजापूर : रत्नागिरीतून बिहारकडे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका ट्रकवर आदळून अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. हा अपघात उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील दुबेपूर रासेना गावाजवळ झाला असून, त्यात रुग्णवाहिका चालक फिरोज खान या चालकाचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.
मृतदेह घेऊन रुग्णवाहिकेतून तीनजण बिहार येथे जात होते. मिर्झापूर जिल्ह्यातील दुबेपूर रासेना गावाजवळ रुग्णवाहिका नियंत्रणाबाहेर जाऊन ट्रकला धडकली. अपघाताची माहिती मिळताच स्टेशन प्रभारी पदरी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. तेथून गंभीर जखमी चालक फिरोज खान याला शहरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पडरी पोलिसांकडून मृतदेह ताब्यात घेऊन नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.
यातील जखमी रुग्णवाहिका चालक फिरोजचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने त्याच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयाबाहेर फिरोजची रुग्णवाहिका नेहमी सेवेसाठी तत्पर असायची. फिराेजच्या मृत्यूची बातमी रत्नागिरीत कळताच अनेकांना धक्का बसला.