शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर पंचायत समितीच्या सभापती प्रमिला कानडे यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशाचे पालन करत राजापूर पंचायत समितीच्या सभापती प्रमिला कानडे यांनी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशाचे पालन करत राजापूर पंचायत समितीच्या सभापती प्रमिला कानडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर उपसभापती उन्नती वाघरे यांच्याकडे सभापतीपदाचा प्रभारी कार्यभार गुरुवारी देण्यात आला. दरम्यान, राजापूर पंचायत समितीच्या सभापतीची निवडणूक पुढील काही दिवसांत होईल, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून, कोंड्ये तर्फे सौंदळ गणाच्या सदस्या करुणा कदम यांची पुढील सभापतीपदी निवड निश्चित मानली जात आहे.

शिवसेनेतील ठरलेल्या सूत्रानुसार शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशानुसार राजापूर पंचायत समितीच्या सभापती प्रमिला कानडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे दिला होता. तो तत्काळ मंजूरही झाला असून, उपसभापती उन्नती वाघरे यांच्याकडे सभापती पदाचा प्रभारी कार्यभार देण्यात आला आहे. यावेळी आमदार राजन साळवी, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर, शहरप्रमुख संजय पवार, जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लिंगायत, कोदवली विभाग प्रमुख संतोष हातणकर, देवाचे गोठणेचे विभागप्रमुख नरेश शेलार, माजी सभापती कमलाकर कदम, सुभाष गुरव, पंचायत समिती सदस्या करुणा कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रभारी सभापती म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर आमदार राजन साळवी यांनी उन्नती वाघरे यांचे अभिनंदन केले.