शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची विश्रांती, नद्यांचे पाणी ओसरले; पुढील २४ तासांत वादळी पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:46 IST

नागरिकांना दिलासा मिळाला

रत्नागिरी : गेले पाच दिवस रात्रीच्या वेळी मुसळधार काेसळणाऱ्या पावसाने साेमवारी सायंकाळपासून थाेडीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने जगबुडी, अर्जुना व काेदवली या नद्यांची पाणीपातळीही कमी हाेऊन इशारा पातळीखाली आली आहे.रविवारी रात्री काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी, बावनदी या नद्यांची पाणीपातळी वाढली हाेती. जगबुडी, अर्जुना व काेदवली या नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या वर पाेहाेचले हाेते. त्यामुळे खेड आणि राजापूर येथील प्रशासन सतर्क झाले हाेते. राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली हाेती. शहरात पुराचे पाणी शिरल्याने व्यापारी धास्तावले हाेते. मात्र, दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर पुराचे पाणी ओसरले हाेते.

चिपळुणात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात साेमवारी दिवसभरात एकूण ६१८.१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्यात २५.५०, खेड ९१.५७, दापोली ६५.८५, चिपळूण १२२.४४, गुहागर ९०.८०, संगमेश्वर ९०.१६, रत्नागिरी २७.४४, लांजा ३५.४०, राजापूर तालुक्यात ६९ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस चिपळूण तालुक्यात, तर सर्वांत कमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात पडला आहे.

२४ तासांत वादळी पावसाचा इशाराभारतीय हवामान खात्याकडून पुढील २४ तासांत जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्याला १९ जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नदी किनारपट्टीलगतच्या ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.