शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्याबाबत राज्य परिवहन निवृत्त कर्मचाऱ्यांचे रत्नागिरी विभागीय कार्यशाळेसमोर आंदोलन

By मेहरून नाकाडे | Updated: January 29, 2024 16:36 IST

रत्नागिरी : राज्य परिवहन निवृत्त कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करूनही महामंडळ व शासनाकडून दखल ...

रत्नागिरी : राज्य परिवहन निवृत्त कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करूनही महामंडळ व शासनाकडून दखल घेण्यात येत नाही. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे सोमवार, दि.२९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात आले.सोमवारी (दि.२९ रोजी) आझाद मैदान (मुंबई) येथेही आंदोलन करण्यात आले. शिवाय प्रत्येक विभागीय कार्यालयासमोर संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली. त्यानुसार रत्नागिरी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची अंतिम देयके अद्याप प्रलंबित आहेत, ती तातडीने अदा करण्यात यावीत. थकीत महागाई भत्ता, थकीत घरभाडे भत्ता तातडीने अदा करण्यात यावा. सर्व थकीत देण्यांवर आठ टक्के दराने व्याज देण्यात यावे.सेवेतून निवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या व वीस वर्षे सेवा करून बडतर्फ झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना वर्षभर राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व गाड्यांमधून प्रवासासाठी विनाअट मोफत पास देण्यात यावा, पेन्शनमध्ये वाढ करावी, सेवानिवृत्तांच्या मुलांसाठी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्यात यावे यासह अनेक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.दीर्घकाल दुर्लक्षित केलेल्या मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे तातडीने या मागण्यांमध्ये लक्ष घालून वयोवृद्ध निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी राज्य परिवहन निवृत्त एसटी कर्मचारी संघटनेच्या रत्नागिरी विभागातर्फे करण्यात आली. यावेळी विभागीय अध्यक्ष शेखर सावंत, विभागीय सचिव पी.एस. जाधव यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. निवृत्त एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagitationआंदोलन