शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण यात्रास्थळांचा विकासाला खीळ

By admin | Updated: July 4, 2015 00:12 IST

अजय बिरवटकर : लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी पाठपुरावा न केल्याचा परिणाम

रत्नागिरी : जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी नियोजन समितीकडे निधी मागणीसाठी वेळीच पाठपुरावा न केल्याने ग्रामीण यात्रास्थळांचा विकास ठप्प असल्याचा आरोप जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते अजय बिरवटकर यांनी केला.पर्यटन विकासाकरिता शासनाने रत्नागिरी जिल्ह्याची निवड केली आहे. याअंतर्गत ग्रामीण यात्रास्थळांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने निधी द्यावा, असे आदेश शासनाने दिले आहेत. यात्रास्थळांच्या विकासाकरिता आवश्यक असलेल्या निधीसाठीचे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी, बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी निधी मागणीचा प्रस्ताव नियोजन समितीकडे पाठवलेला नाही. पलाकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा केली. प्रस्तावच न पाठवल्याने निधी देणे शक्य नसल्याचा खुलासा नियोजन अधिकाऱ्यांनी याच बैठकीत केल्याचे बिरवटकर यांनी सांगितले. पर्यटन विकासासोबत स्थानिक पातळीवरील रोजगार, स्वयंरोजगाराची संधी जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभारामुळे हुकल्याचा आरोप बिरवटकर यांनी केला.तेराव्या वित्त आयोगाची मुदत ३० सप्टेंबर २०१५ला संपत आहे. जिल्हा परिषदेच्या चिपळूण, रत्नागिरी बांधकाम विभागाने २८ मे रोजी रस्ता डांबरीकरणाच्या निविदा प्रसिद्ध केल्या. ३० सप्टेंबरपर्यंत परिपूर्ण निविदा आॅनलाईन पद्धतीने स्वीकारल्या जाणार आहेत. तेराव्या वित्त आयोगाची मुदत याच दिवशी संपत असल्याने निधीअभावी रस्ता डांबरीकरणाचे कामही ठप्प होणार असल्याचे मत बिरवटकर यांनी व्यक्त केले. १५ मे ते १५ आॅक्टोबर या कालावधीत रस्ता डांबरीकरणाची कामे करु नयेत, असा निर्णय शासनाच्या ग्रामविकास, जलसंधारण विभागाने यापूर्वीच घेतला आहे. मार्च महिन्यात निविदा प्रसिद्ध झाल्या असत्या, तरच आयोगाची मुदत संपण्यापूर्वी रस्ता डांबरीकरणासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा परिषद स्तरावर उपलब्ध झाला असता. उशिरा निविदा प्रसिद्ध करणाऱ्या बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी कारवाई करावी, अशी मागणी बिरवटकर यांनी केली. शेतकऱ्यांना अनुदानावर भात-बियाणे, खते उपलब्ध करुन दिली जातात. अधिकाऱ्यांनी निधी मागणीचा प्रस्ताव नियोजन समितीकडे पाठवलेला नसल्याचे बिरवटकर यांनी उघड केले आहे. अनुदानासाठीचा निधी मंजूर न झाल्याने यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खतापासून वंचित राहावे लागणार आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते अजय बिरवटकर यांनी लोकप्रतिनिधींवर तोफ डागली. पर्यटन विकासाचा जिल्हा जाहीर तरीही पाठपुरावा करण्यात कमी. शासनाने रत्नागिरी जिल्ह्याची निवड केल्याने ग्रामीण यात्रास्थळांचा विकास शक्य. विकासकामांसाठी पाठपुरावा कोण करणार.