शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, आंबा बागायतदार धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 11:14 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

रत्नागिरी : अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. असे असतानाच आज पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत.वातावरण बदलाचे  परिणाम वारंवार दिसून येत आहेत. गेल्या दशकभरात नोव्हेंबर महिन्यातील पावसाचं प्रमाण दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सांताक्रझ येथील पर्जन्यमापकामध्ये २४.७ मिमी पावसाची नोंद नोव्हेंबर महिन्यात झाली आहेत. अधिकाऱ्यांनी अवकाळी पाऊस पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानं पुढील काही दिवसांसाठी 'यलो अ‌लर्ट' जारी केला आहे.

मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्याला 'यलो अलर्ट' देण्यात आला असून, त्याप्रमाणे जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून पावासाला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागात ३ डिसेंबरपर्यंत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचा इशारा आयएमडीनं दिला आहे. महाराष्ट्रात आज मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, धूळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस