जयगड खाडीत पडून तवसाळ येथील प्राैढाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:33 IST2021-09-26T04:33:52+5:302021-09-26T04:33:52+5:30

गुहागर : जयगडच्या खाडीत बाेटीतून पडलेल्या तवसाळ (ता. गुहागर) येथील प्राैढाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुनील गजानन ...

Praidha from Tavsal died after falling into Jaigad creek | जयगड खाडीत पडून तवसाळ येथील प्राैढाचा मृत्यू

जयगड खाडीत पडून तवसाळ येथील प्राैढाचा मृत्यू

गुहागर : जयगडच्या खाडीत बाेटीतून पडलेल्या तवसाळ (ता. गुहागर) येथील प्राैढाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुनील गजानन सुर्वे (४३, रा. तवसाळ खुर्द भंडारवाडा) असे त्यांचे नाव असून, दाेन दिवस ते बेपत्ता हाेते. तवसाळ समुद्रकिनारी शुक्रवारी दुपारी त्यांचा मृतदेह आढळला.

सुनील सुर्वे यांना दारूचे व्यसन होते. काही वर्षांपूर्वी सुनील यांच्या काकाचा अशाच प्रकारे बोटीवरून पडून मृत्यू झाला होता. सुनील सुर्वे हे २२ राेजी बोटीतून खाली पडले हाेते. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी रात्री गुहागर पोलिसांना माहिती दिली हाेती. त्यांचा शाेध सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी तवसाळ येथील समुद्र किनाऱ्यावर स्मशानभूमीजवळ त्यांचा मृतदेह आढळला. ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर संतोष भार्गव सुर्वे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Web Title: Praidha from Tavsal died after falling into Jaigad creek