लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, चिपळुणात राजकीय पदाधिकाऱ्याला पोक्सोअंतर्गत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:45 IST2026-01-19T20:44:51+5:302026-01-19T20:45:40+5:30

राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

Political office bearer arrested under POCSO in Chiplun for having sexual relations on the pretext of marriage | लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, चिपळुणात राजकीय पदाधिकाऱ्याला पोक्सोअंतर्गत अटक

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, चिपळुणात राजकीय पदाधिकाऱ्याला पोक्सोअंतर्गत अटक

चिपळूण : तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. मंदार मंगेश कदम असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकारानंतर चिपळुणातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार हा प्रकार एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडला आहे. संशयिताने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयितावर चिपळूण पोलिस स्थानकात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Political office bearer arrested under POCSO in Chiplun for having sexual relations on the pretext of marriage