शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत सुविधा नसल्याने खेळाडूंची होतेय मुस्कटदाबी

By admin | Updated: December 29, 2014 00:00 IST

उमेश सावंतांची खंत : ‘अ‍ॅकॅडमी’ राष्ट्रीय खेळाडू निर्माण करणार

कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गुणवंत खेळाडू आहेत. मात्र, त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या खेळावर परिणाम होत आहे. क्रीडांगणाबरोबरच अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कनक स्पोर्ट अ‍ॅकॅडमीने आता उचलली आहे. त्यामुळे या सुविधांचा लाभ घेऊन भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निश्चितच तयार होतील, असा विश्वास अ‍ॅड. उमेश सावंत यांनी व्यक्त केला.येथील मुडेश्वर मैदानावर कनक स्पोर्ट अ‍ॅकॅडमीचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कनक स्पोर्ट अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष डॉ. तुळशीराम रावराणे, कार्याध्यक्ष शेखर राणे, सचिव नंदकिशोर सावंत, उपाध्यक्ष मधुकर सावंत, मिलिंद बेळेकर, नगरसेवक रूपेश नार्वेकर, सुशांत नाईक, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. बी. जी. शेळके, सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर, योगेश सावंत, नीलम सावंत - पालव, अनिल हळदिवे, माधुरी गायकवाड, सुभाष सावंत, पंचायत समितीचे माजी उपसभापती तुळशीदास रावराणे, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.यावेळी अ‍ॅड. उमेश सावंत म्हणाले, कणकवली शहराला अद्ययावत क्रीडांगणाची आवश्यकता आहे. क्रीडांगणाबरोबरच अन्य सुविधा उपलब्ध झाल्यास येथील खेळाडू आणखीन चांगल्या प्रकारे आपल्या खेळाची चमक दाखवू शकतील. तसेच इतर जिल्ह्यातील खेळाडूंच्या तुलनेत आपला वेगळा ठसा उमटवू शकतील. त्यासाठी शहरातील खेळाडू व क्रीडाप्रेमींनी एकत्र येत कनक स्पोर्ट अ‍ॅकॅडमीची स्थापना केली आहे. त्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. अशोक करंबेळकर म्हणाले, चांगले खेळाडू तयार होण्यासाठी पालकांचाही खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. क्रीडा क्षेत्र विकसीत होण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांनी नैतिक तसेच आर्थिकदृष्ट्याही क्रीडा संघटनांना पाठबळ दिल्यास निश्चितच चांगले खेळाडू घडू शकतील. या अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून लवकरच अद्ययावत क्रीडांगण उभारण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नगरसेवक सुशांत नाईक, योगेश सावंत, नीलम सावंत - पालव, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. बी. जी. शेळके यांनीही मनोगत व्यक्त केले. नंदकिशोर सावंत यांनी प्रास्ताविक करताना अ‍ॅकॅडमीच्या उद्देशांबाबत माहिती दिली. डॉ. तुळशीराम रावराणे यांनी आभार मानले. श्याम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)