शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

असोंड येथे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

वर्धापन दिन साजरा रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कीर कला अकादमीचा १० वा वर्धापन दिन अकादमीच्या सराव हाॅलमध्ये ...

वर्धापन दिन साजरा

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कीर कला अकादमीचा १० वा वर्धापन दिन अकादमीच्या सराव हाॅलमध्ये साजरा करण्यात आला. कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करून नटराज पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी माजी कार्याध्यक्ष रमेश कीर, नमिता कीर, डाॅ. नितीन चव्हाण उपस्थित होते.

चिंचघर येथे वृक्षारोपण

खेड : तालुक्यातील चिंचघर गावातील रस्त्यालगत ग्रामपंचायत व दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. जंगलतोड व अन्य कारणांमुळे झाडांची संख्या कमी होत असल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

बाढकर यांचा सत्कार

आरवली : धामापूर तर्फ संगमेश्वर येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या (कै.) पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आप्पा बाढकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

गरजूंना धान्यवाटप

राजापूर : तालुक्यातील खिणगिणी येथील युवा सेना शाखेतर्फे आमदार राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. युवा सेनेचे विभागीय युवा अधिकारी वैभव कोकरे यांच्या माध्यमातून गरजू व गरीब कुटुंबांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

विविध याेजनांचे मार्गदर्शन

मंडणगड : कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यातील विविध गावांमधील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. आंबवली, साखरी, वेळास, बाणकोट, धामणी, गोठे, नारगोली गावातील शेतकऱ्यांना योजनांची माहिती देण्यात आली.

ऊन्हाचा कडाका

दापोली : गेले आठवडाभर पाऊस गायब असून, उन्हाचा कडाका वाढला आहे. भात लागवड केलेली रोपे पिवळी पडली आहेत. तापमान वाढल्याने उकाडा असह्य होत असून, भर पावसाळ्यात ऊन्हाळ्याची अनुभूती येत आहे. शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाले आहेत.

बस सुरू करण्याची मागणी

खेड : कोरोनामुळे लाॅकडाऊन काळात बंद करण्यात आलेली खेड - बिरमणी बससेवा अद्याप बंद आहे. ही बससेवा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन बिरमणी वैचारिक मंचचे दीपक मोरे यांनी आगारप्रमुख प्रशांत करवंदे यांना दिले. बस बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

गणेश मोरे यांची निवड

खेड : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंचतर्फे राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पंचायत समिती सदस्य गणेश मोरे यांनी उपविजेतेपद पटकावले आहे.

विलगीकरण कक्ष सुरू

गुहागर : तालुक्यातील कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुडली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कोरोना विलगीकरण कक्षाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती पूर्वी निमुणकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, आदी उपस्थित होते.