शीळ धरण-जॅकवेलपर्यंत पाइपलाइनचे काम पूर्ण, जॅकवेल कोसळल्यामुळे निर्माण झाला होता पाणीप्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:20 IST2025-06-25T17:20:04+5:302025-06-25T17:20:19+5:30

येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पाण्याची चाचणी घेण्यात येणार

Pipeline work completed from Sheel Dam to Jackwell, water problem was caused due to Jackwell collapse | शीळ धरण-जॅकवेलपर्यंत पाइपलाइनचे काम पूर्ण, जॅकवेल कोसळल्यामुळे निर्माण झाला होता पाणीप्रश्न 

शीळ धरण-जॅकवेलपर्यंत पाइपलाइनचे काम पूर्ण, जॅकवेल कोसळल्यामुळे निर्माण झाला होता पाणीप्रश्न 

रत्नागिरी : शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतची सुमारे साडेसहाशे मीटरची पाइपलाइन टाकण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. ते पाइप वाहून जाऊ नये यासाठी त्यावर काँक्रिट टाकून मजबूत केले आहे. येत्या दोन दिवसांत चाचणीही घेतली जाणार आहे. त्यामुळे लवकरच ६ फ्लोटिंग पंप बंद हाेणार आहे. २ वर्षे वीजपंपांच्या बिलाचा पडणारा भुर्दंड थांबणार.

शहराला पाणी पुरवठा करणारी शीळ जॅकवेल कोसळल्यामुळे शहरातील पाणीप्रश्न निर्माण झाला होता. त्यावर तात्पुरता पर्याय म्हणून ६ फ्लोटिंग पंप बसविले आहेत. सुधारित पाणी योजनेमध्ये शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत सुमारे साडेसहाशे मीटरच्या पाइपलाइनचा समावेश आहे; परंतु दोन महिने झाले तरी ही पाइपलाइन टाकण्याच्या दृष्टीने अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत.

आता पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली तर शीळ नदीवरील फ्लोटिंग पंप वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. गेल्या वर्षी टाकलेले पाइप पावसामध्ये वाहून गेले. यामध्ये मोठे नुकसान झाले हाेते.

शीळ धरणापासून ते नदीच्या पात्रातून खोदकाम करून ही पाइपलाइन जॅकवेलमध्ये सोडण्यात आली आहे. पावसाळ्यात पाइपलाइन वाहून जाण्याचा अनुभव पाठीशी असल्याने पावसापूर्वी पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्या वाहून जाऊ नयेत यासाठी त्यावर काँक्रिट टाकण्यात आले आहे.

काम पूर्ण झाल्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये चाचणी घेऊन लवकरच नैसर्गिक उताराने जॅकवेलपर्यंत पाणी येणार आहे. यामुळे नदीतील ६ फ्लोटिंग पंप बंद होऊन वीज बिलाचा आर्थिक भार कमी होणार आहे. 

Web Title: Pipeline work completed from Sheel Dam to Jackwell, water problem was caused due to Jackwell collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.