शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

दाखल्यांचा ढीगच्या ढीग

By admin | Updated: August 26, 2015 23:17 IST

तहसील कार्यालय : रत्नागिरीत पालकांची धावपळ

रत्नागिरी : सध्या तहसील कार्यालयात उत्पन्नाच्या दाखल्यांचे ढिगारे सहीसाठी साचू लागले आहेत. हे दाखले वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामात अडचणी येत आहेत. कागदपत्रे पूर्ण देऊनही केवळ सह्यांसाठी पालकांना महिने - दोन महिने खेटे मारावे लागत आहेत.दाखल्यांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी उत्पन्नाचे दाखल्यांसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करण्याबाबत नायब तहसीलदारांना ही जबाबदारी दिली आहे. यासाठी या नायब तहसीलदारांना ठराविक वार आणि महा ई-सेवा केंद्रे ठरवून देण्यात आली आहेत. येथील संजय गांधी योजना विभाग, निवडणूक शाखा, महसूल विभाग, पुरवठा विभाग यांचे नायब तहसीलदार तसेच निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, काही नायब तहसीलदार वगळता इतरांकडून या दाखल्यांची तपासणी वेळेवर होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. येथील तहसीलदार कार्यालयात या कागदपत्रांचा ढिगारा पडला आहे. पावतीवरील तारीख उलटून महिना झाला, तरीही उत्पन्नाचा दाखला मिळत नसल्याने पालकवर्गाला हेलपाटे मारावे लागत आहेत. उत्पन्नाच्या दाखल्याअभावी शैक्षणिक कामे अडून राहिली आहेत.शाळांनी उत्पन्नाचे दाखले सक्तीचे केल्याने या दाखल्यांसाठी पालकांची धावपळ होत आहे. मात्र, उत्पन्नाचे दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी नेमण्यात आलेले अधिकारी त्यासाठी दोन-दोन दिवस लावत असल्याने दाखल्यांना विलंब होत असल्याचे दिसत आहे.नागरिकांना आपल्या कागदपत्रांची शोधाशोध करून ती काढून घ्यावी लागत आहेत. काही वेळा नागरिकांची गैरसोय नको, म्हणून सहकार्याच्या भावनेने काही नायब तहसीलदार वार नसतानाही सह्या करून देत आहेत. निवासी नायब तहसिलदारांकडील दाखले वेळेवर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. याप्रकरणी तहसीलदार हेमंत साळवी यांनी लक्ष घालून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)1अनेक शासकीय कार्यालये संगणकीकृत असूनही आता कामात उशीर होेत आहे.2पूर्वी गाव पातळीवर उत्पन्नाचे दाखले वेळेवर मिळत होते. आता तेही उशिराने मिळत आहेत.3उत्पन्नाचे दाखले बंधनकारक केल्याने ते मिळवताना विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.