शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

परटवली ग्रामपंचायतीला दणका

By admin | Updated: July 2, 2015 23:27 IST

माहितीचा अधिकार : विकासकामांची माहिती देण्यास टाळाटाळ

रत्नागिरी : राजाराम सीताराम रहाटे यांना परटवली ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद व इतर योजनांमधून केलेल्या विकासकामांची माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती जनमाहिती अधिकारी यांनी द्यावी. २०११ ते २०१३ या दोन वर्षातील २०० पृष्ठांपर्यंतची माहिती नोंदणीकृत पोस्टाने विनामूल्य पुरवावी. पुढील माहिती आवश्यक शुल्क घेऊन पाठवावी, असे निर्देश राज्याचे माहिती आयुक्त (कोकण खंडपीठ) थॅँक्सी फ्रान्सिस थेकेकरा यांनी दिले आहेत. रहाटे हे परटवली गावचे मूळ रहिवासी असून, सध्या ते कुर्ला, मुंबई येथे राहतात. २ मार्च २०१३ रोजी त्यांनी माहितीच्या अधिकारात चार मुद्द्यांच्या आधारे परटवलीत झालेल्या विकासकामांची माहिती मागितली होती. मात्र, रहाटे यांना उत्तरादाखल माहिती न पाठविता माहिती पाहण्याकरिता दोन महिन्यांनी कळविण्यात आले. रहाटे यांचे प्रतिनिधी विजय एस. कुर्ले कागदपत्रांच्या पाहणीस गेले असता त्यांना चांगली वर्तणूक देण्यात आली नाही, असा दावा राहाटे यांनी केला. माहिती सुस्पष्टरित्या मागितलेली असता दिली नाही म्हणून राहाटे यांनी प्रथम अपील जुलै २०१३मध्ये दाखल केले. मात्र, अपिलार्थी माहिती निरीक्षणास आले. परंतु प्रकृती बरी नसल्याचे सांगून ते निघून गेले, असे जनमाहिती अधिकारी यांचे म्हणणे होते.१० सप्टेंबर २०१४ रोजी दुसरे अपील दाखल केले. दुसरी सुनावणी २९ जून २०१५ रोजी झाली. त्यावेळी अपिलार्थी रहाटे यांचे प्रतिनिधी विजय कुर्ले तसेच जनमाहिती अधिकारी तथा परटवलीचे ग्रामसेवक पी. बी. आसवे, प्रथम अपिलीय अधिकारी व राजापूूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) डी. पी. नाटेकर उपस्थित होते. एकूणच प्रकरणाबाबत युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर माहिती आयुक्तांनी रहाटे यांचे अपील अंशत: मान्य केले. एवढी विस्तृत माहिती देणे शक्य नाही. मात्र, परटवली ग्रामपंचायत लहान असल्याने जनमाहिती अधिकाऱ्यांनी २०११ - १२ व २०१२ - १३ या दोन वर्षांची विकासकामांची माहिती रहाटे यांना २०० पृष्ठांपर्यंत माहिती अधिकारातील तरतुदीनुसार नोंदणीकृत पोस्टाने विनामूल्य पुरवावी. उर्वरित माहिती शुल्क आकारून पुरवावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय माहिती आयोगाने दिला. (प्रतिनिधी)वेबसाईटवर परटवलीची माहितीच नाही...सन २०१०पासून संग्राम.को.इन या वेबसाईटवर ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणारा खर्च, राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती जनतेसाठी प्रसिध्द केली जात आहे, हा जनमाहिती अधिकाऱ्यांनी केलेला दावा चुकीचा ठरला. या वेबसाईटवर आयोगाने तपासणी केली असता परटवली ग्रामपंचायतीची कोणतीही माहिती भरलेली नाही, असे आढळून आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी येत्या १५ दिवसांत ही सर्व माहिती वेबसाईटवर भरण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही माहिती आयुक्तांनी दिले आहेत.