काेकरे परिसरात भातशेती लावणी ७० टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:00+5:302021-07-02T04:22:00+5:30

असुर्डे : चिपळूण तालुक्यातील कोकरे असुर्डे परिसरात ७० टक्के भात लावणी पूर्ण झाली आहे. आता लावणीच्या कामाला चांगलाच ...

Paddy cultivation in Kaekare area is 70 percent complete | काेकरे परिसरात भातशेती लावणी ७० टक्के पूर्ण

काेकरे परिसरात भातशेती लावणी ७० टक्के पूर्ण

असुर्डे : चिपळूण तालुक्यातील कोकरे असुर्डे परिसरात ७० टक्के भात लावणी पूर्ण झाली आहे. आता लावणीच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. दमदार पावसामुळे वरकस जमिनीतील भात लावणी सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी केली. आता पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकरी पाणथळ शेतीच्या लावणीकडे वळला आहे.

लाॅकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांत भातशेती लागवडीचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. चाकरमानी तसेच ग्रामस्थांनाही शेतीची गरज व महत्त्व पटू लागले आहे. नवीन तंत्रज्ञान व बी-बियाणे, खते यामुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करू लागला आहे. एक काडी, दोन काडी किंवा तीन काडीचे भात रोप करत असल्याने मशागत व रोप काढण्याचा खर्च फार कमी झाला आहे. परंतु, मजुरांची मजुरी व नांगरणी दर वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. आता बऱ्याच ठिकाणी शेतकरी नांगरणीसाठी पॉवर टिलरचा वापर करू लागले आहेत. तर काही बैलांचे हौशी शेतकरी अजून बैल जोड्यांवर नांगरणी करत आहेत.

010721\img_20210701_104326.jpg

पॉवर टिलर ऐवजी भातशेती बैलजोड्यांच्या मदतीने नांगरणी करून पेट्रोल खर्च वाचविण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न .

Web Title: Paddy cultivation in Kaekare area is 70 percent complete