शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

लेखन स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:38 IST

रत्नागिरी : हागणदारी मुक्त कार्यक्रम अधिक सक्रिय करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर हागणदारीमुक्त अधिक विषयावर घोषवाक्य, लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली ...

रत्नागिरी : हागणदारी मुक्त कार्यक्रम अधिक सक्रिय करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर हागणदारीमुक्त अधिक विषयावर घोषवाक्य, लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरअखेर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. स्पर्धेचा उद्देश कार्यक्रमाबाबत जाणीव जागृतीद्वारे लोकसहभाग वाढविणे आहे.

रस्त्यांची डागडुजी

राजापूर : राजापूर, हर्डी, रानतळे रस्ता पावसामुळे खचला होता. रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली असून, या मार्गावरील वाहतूक लवकरच सुरू होणार आहे. रस्ता खचल्यामुळे एस.टी.सह अवजड वाहनांसाठी मार्ग बंद ठेवण्यात आला होता. मात्र, दुरुस्तीमुळे या मार्गावरील फेऱ्या लवकरच सुरू होणार असून, ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे.

पाटणकर यांची निवड

राजापूर : तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अफजल पाटणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच अपेक्षा मासये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत पाटणकर यांची निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच किशोर नारकर, ग्रामविकास अधिकारी अर्जुन नागरगोजे उपस्थित होते.

झाडी तोडण्याची मागणी

राजापूर : राजापूर रेल्वे स्टेशन, केळवली, भुईबावडा मार्गावरील वाहतूक वाढली आहे. या मार्गावरील अनेक ठिकाणी झाडी वाढल्याने वाहतुकीला अडथळे ठरत आहेत. खड्ड्यांमुळे वाहन चालविणे अशक्य झाले आहे. तातडीने झाडी तोडून मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

मूर्तिशाळेत लगबग

रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून मूर्तिशाळेमध्ये कामांची लगबग वाढली आहे. दिनांक ८ व ९ रोजी काही भाविक गणेशमूर्ती घरी घेऊन जाणार आहेत. त्यामुळे मूर्तिकार मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात व्यस्त आहेत. रात्रपाळी करून रंगरंगोटीचे काम प्राधान्याने पूर्ण केले जात आहे.