शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

झोप अनावर झाल्याने चालकाचा ताबा सुटून कार उलटली, वृद्धाचा मृत्यू; खेडनजीक अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 2:27 PM

सुदैवाने या अपघातात कारमधील लहान मुलांना दुखापत झालेली नाही.

खेड : मुंबईतून लांजा येथील गावी येत असताना चालकाला झोप अनावर झाली आणि कार रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन उलटली. या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला असून, अन्य तीन प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज, शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता उधळे (ता. खेड) येथे झाला. गणपत नारायण नामे (वय-७५) असे मृत्यू वृद्धाचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, संजय गणपत नामे (४३) हे कारने मुंबईतील मालाड येथून आपल्या लांजा तालुक्यातील पालू गावी येत होते. त्यांच्यासोबत वडील गणपत नामे, संतोष गणपत नामे (४५), अंजना संतोष नामे (३८), संचित संतोष नामे (८), श्रीवल्ली संदीप नामे (८) हे प्रवास करत होते. खेड तालुक्यातील उधळे दरम्यान गाडी आली असता चालक संजय नामे याला झोप अनावर झाली. त्यामुळे कारवरील ताबा सुटून कार महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन उलटली.या अपघातात वडील गणपत नामे यांना जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक संजय नामे, संताेष नामे, अंजना नामे किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कारमधील लहान मुलांना दुखापत झालेली नाही.या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस कर्मचारी समेळ सुर्वे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, खेड पोलीसही अपघातस्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी अपघातग्रस्त प्रवाशांना बाहेर काढून तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात