शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटींची कामे रखडली

By admin | Updated: July 14, 2015 21:43 IST

नगरोत्थान योजना : चिपळुणातील निधी परत जाण्याची भीती

चिपळूण : नगरोत्थान योजनेअंतर्गत सुमारे १ कोटी ८२ लाख २० हजार ९५० रुपयांची शहरातील विविध विकासकामे मंजूर झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांना कामाचा आदेश देण्यात आला. मात्र, कामे सुरु न झाल्याने हा निधी परत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रशासन यासंदर्भात कोणती भूमिका घेणार, याकडेही शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. पावसाळ्यापूर्वी विकासकामे व्हावीत, यादृष्टीने नगर परिषद प्रशासनाने नगरोत्थान योजनेअंतर्गत १ कोटी ८२ लाख २० हजार ९५० रुपयांची कामे मंजूर केली. ही सर्व कामे कमी दराची असून, १ कोटी ४४ लाख ९५ हजार ८८९ रुपयांची आहेत. गोवळकोट चौगुले घर ते मुख्य रस्ता डांबरीकरण १७ लाख ९ हजार २०० रुपयांचे हे काम असून, साई कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले आहे. या कामाचा आदेश ३० एप्रिल रोजी संबंधित ठेकेदाराला देण्यात आला आहे. रावतळे मुत्तपन्न मंदिर येथे साकव बांधण्याचे १३ लाख २० हजार २०० रुपयांचे काम असून, या कामाचा आदेश २९ एप्रिल रोजी रेणुका कन्स्ट्रक्शनला देण्यात आला आहे. वाणीआळी मुरलीधर मंदिर ते महाराष्ट्र हायस्कूलपर्यंतच्या डांबरीकरणाचे काम ९ लाख २८ हजार ८०० रुपयांचे असून, हे काम महेंद्र पालांडे यांना देण्यात आले असून, १४ मे रोजी कामाचा आदेश देण्यात आला आहे. वाणीआळी नवा कालभैरव मंदिर ते मुरलीधर मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे काम ९ लाख २८ हजार ८०० रुपयांचे असून, हे काम पंकज मोरे यांना देण्यात आले आहे. त्यांनी अद्याप करारनामा केलेला नाही. रॉयलनगर येथे आरसीसी गटार बांधण्याचे काम अंदाजे २२ लाख ५ हजार ९०० रुपयांचे असून, हे काम रेणुका कन्स्ट्रक्शनला देण्यात आला आहे. या कामाचा आदेश २९ एप्रिल रोजी संबंधित ठेकेदाराला देण्यात आला आहे. मतेवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मुख्य रस्ता ते आशीर्वाद अपार्टमेंटपर्यंतचे काम सुमारे १३ लाख २३ हजार २०० रुपयांचे असून, महेंद्र पालांडे यांना १४ मे रोजी कामाचा आदेश देण्यात आला. काविळतळी मुख्य रस्ता ते शालोम गल्ली पेविंग ब्लॉक व पाखाडीचे काम १६ लाख ८५ हजार ७०० रुपयांचे आहे. हे काम रेणुका कन्स्ट्रक्शनला देण्यात आले असून, या कामाचा आदेश देऊनही हे काम अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. गोवळकोट रोड ते गणेशघाट रस्ता डांबरीकरणाचे काम २१ लाख १८ हजार १०० रुपयांचे आहे. या कामाचा आदेश २९ एप्रिल रोजी रेणुका कन्स्ट्रक्शनला देण्यात आला. बचपन स्कूल ते विचारे घर डांबरीकरणाचे काम १६ लाख ११ लाख ६००चे असून, ठेकेदार प्रथमेश कापडी यांना कामाचा आदेश ८ मे रोजी देण्यात आला आहे. (वार्ताहर) प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्षअंदाजपत्रकीय रकमेपेक्षा कमी दराची ही कामे आहेत. ९० दिवसांमध्ये काम करण्याची मुदत संबंधित ठेकेदारांना देण्यात आली आहे. मात्र, मुदतीत कोणत्याच ठेकेदाराने हे काम सुरु न केल्याने नगरोत्थान योजनेअंतर्गत अंदाजे दीड कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता आहे. प्रशासन या ठेकेदारांबाबत कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.