शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार शेडच्या खर्चाचा हिशोबच नाही

By admin | Updated: July 14, 2015 21:45 IST

गुहागर तालुका : कीचनशेडमध्ये सुविधांची वानवा

असगोली : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आहार शिजवून देण्याकरिता शासनाकडून उभारण्यात आलेल्या प्री फायबर कीचनशेडमध्ये कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नसल्याने या कीचनशेड बिनकामाच्या ठरत आहेत. त्यातच एका कीचनशेडमागे किती खर्च केला जातो, याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाला नसल्याने धक्कादायक उत्तर देण्यात आले आहे.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतच आहार शिजवून देण्यासाठी शालेय पोषण आहार ही योजना शासनाने जाहीर केली. काही शाळांमधून ग्रामस्थांनी लोकसहभागातून आहार शिजवण्याकरिता जागा उपलब्ध करुन दिल्या. मात्र, अन्य शाळांमधून आहार शिजवण्याची गैरसोय होत होती. याकरिता शिक्षण विभागाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत जास्त पटसंख्या असलेल्या शाळांकरिता कमीत कमी एक लाख, तर जास्तीत जास्त दोन लाखांचा निधी खर्च करुन सुसज्ज स्लॅबच्या इमारती उभारल्या. तसेच कमी पटसंख्येच्या शाळांकरिता शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्री - फायबरच्या कीचनशेडचे छप्पर पत्र्याचे असले तरी चारही बाजूंनी प्री - फायबरच्या भिंती आहेत. ग्रामीण भागातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांना अशा प्रकारची कीचनशेड उभारली जात असून, या कीचनशेडमध्ये ओट्याची व्यवस्था नाही. परिणामी या भागातील शाळांमध्ये चुलीवरच हे अन्न शिजवले जात आहे. या शेडमध्ये चुलीवरचे जेवण केल्यास या शेडच्या चारी बाजूनी असलेल्या प्री - फायबर भिंती केव्हीही वितळू अथवा पेट घेवू शकतात. यामुळे ग्रामीण भागातील या कीचनशेड धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.यामुळे तालुका व जिल्ह्यातून या कीचन शेडना प्रखर विरोध झाला. तरीही शासनाने राज्यस्तरावर याचा ठेका नागपूर व ठाणे येथील ठेकेदाराला देऊन या प्री - फायबर कीचनशेड जिल्हा व तालुक्याच्या माथी मारल्या आहेत. ज्या ठिकाणी ग्रामस्थांनी अन्न शिजवण्यासाठी व्यवस्था केली आहे, अशा ठिकाणीसुद्धा जबरदस्तीने उभारलेल्या या कीचनशेड बिनकामाच्या ठरत आहेत. काही शाळांमधून याचा वापर प्रयोगशाळांसाठीही केला जात आहे. या प्री-फायबर कीचनशेडचा कागदोपत्री आराखडा तालुका व जिल्हा शिक्षण विभगात आहे. मात्र, कीचनशेडसाठी किती खर्च होतो, याचे उत्तर शिक्षणाधिकाऱ्यांनासुद्धा देता न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (वार्ताहर)